सहा गुरुजींकडून पेशालाच काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:10+5:30

शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी आल्यावर वागणूक बिघडली की ‘शाळेत हेच शिकवितात का?’ असे विचारले जाते तर शाळेत विद्यार्थ्याला ‘घरी असेच शिकवितात का?’ असा प्रश्न केला जातो. त्यामुळे घरामागे शाळा आणि शाळेमागे घर असं हे विद्यार्थी दशेतील समीकरण आहे.

Six Guruji's profession is blackened | सहा गुरुजींकडून पेशालाच काळीमा

सहा गुरुजींकडून पेशालाच काळीमा

Next
ठळक मुद्देचौघांवर अत्याचाराचा ठपका : दोघांनी मद्य प्राशन करून घातला धिंगाणा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशाची पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. पालकानंतर शिक्षकालाच गुरूचे स्थान दिले आहे. मात्र, जिल्हा परिषद शाळेतील काही गुरुजींकडूनच आपल्या पेशाला काळीमा फासल्या जात असल्याचे जिल्ह्यातील विविध पाच घटनांवरून पुढे आले आहे. शाळेमध्येही विद्यार्थी व विद्यार्र्थिनी सुरक्षीत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या संरक्षणार्थ शाळा स्तरावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची घरी आल्यावर वागणूक बिघडली की ‘शाळेत हेच शिकवितात का?’ असे विचारले जाते तर शाळेत विद्यार्थ्याला ‘घरी असेच शिकवितात का?’ असा प्रश्न केला जातो. त्यामुळे घरामागे शाळा आणि शाळेमागे घर असं हे विद्यार्थी दशेतील समीकरण आहे.
पालकांप्रमाणे शिक्षकांचीही मोठी जबाबदारी असल्याने पालक विश्वासामुळेच आपल्या पाल्याला शाळेत घालतो. बहुतांश शिक्षकांनी अज्ञानाच्या खाणीतून हिरे घडविले आहे तर, काहींनी उमलत्या कळ्याच खुडल्याचे प्रकरण पुढे आले आहे. नुकताच भोसा येथील प्रकरणाने पालकांत चिड निर्माण झाली आहे. शिक्षकांवरील विश्वास उडायला लागला असून शाळेतही विद्यार्थी असुरक्षीत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात २०१५ पासून तब्बल सहा शिक्षकांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून पेशालाच काळीमा फासला आहे. त्यापैकी देवळी, सेलू, हिंगणघाट व भोसा येथे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अत्याचाराचा ठपका ठेवण्यात आला. त्यापैकी तीन शिक्षकांवर निलंबनाची तर भोसा येथील शिक्षकावर सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासोबत मद्यप्राशन करुन जिल्हा परिषदमध्ये गोंधळ घालणाºया आष्टीच्या तर मद्यधुंद अवस्थेत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धिंगाणा घालणाºया चाणकीच्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. एका दोघाच्या अशा कृत्यामुळे इतरही शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असून शिक्षण विभागानेही योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

गेल्यावर्षी दोन, यावर्षी तिघांवर कारवाई
शिक्षकांकडून कर्तव्यात कसूर करण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे. मागील वर्षी अत्याचार व विनयभंगप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तर यावर्षी दोन महिन्यांमध्येच तीन शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दोन शिक्षकांनी मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याने त्यांना निलंबित तर एका शिक्षकाला अत्याचार प्रकरणी बडतर्फ केले.

शाळांची समित्यांकडे पाठ
शाळेतील विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक-पालक समिती आणि महिला तक्रार निवारण समिती गठित करणे बंधनकारक आहे. शिक्षक पालक समितीचे अध्यक्ष पालक तर सचिव मुख्याध्यापक असतात. तसेच महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष महिला पालक, सचिव शाळेतील शिक्षिका व इतर पालक सदस्य असतात. बहुतांश शाळांमध्ये या समित्यांचे कागदोपत्री गठण केले जातात. शिक्षक पालक समिती स्थापन होत असली तरी महिला तक्रार निवारण समिती गठित करताना अडचण होते. बहुतांश शाळांमध्ये महिला शिक्षक नाही. म्हणून आता प्रत्येक शाळेत या समित्या आहे की नाही, तक्रारीअंती दखल घेतात की नाही, याची शहानिशा करण्याची गरज आहे.

संघटनेच्या आड चालविला उपद्रव
शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने शिक्षकांच्याही संघटना कार्यरत आहे. पण, काही शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचा आडोसा घेत पेशाला काळीमा फासण्याचा उपद्रव चालविल्याचे नुकताच घडलेल्या प्रकारावरुन पुढे आले आहे. यापूर्वी एकाने विद्यादानाचे कार्य सोडून आपलपोटेपणा सुरु केल्याने निलंबनाला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्हा परिषदेत लुडबूड करुन पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने जवळचीच शाळा मिळविली. तेथेही कुरापती सुरुच ठेवल्याने शिक्षिकेकडून विनयभंगाची तक्रार करण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला गालबोट लावण्यांवर कठोर कारवाई हाच पर्याय आहे.

Web Title: Six Guruji's profession is blackened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.