पूरग्रस्तांसाठी सहा लाखांचे साहित्य रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:47 PM2019-08-17T23:47:32+5:302019-08-17T23:48:01+5:30
सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. याच पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन विविध सामाजिक संघटनांनी केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल सहा लाख रुपये किंमतीचे जीवनावश्यक साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे.
पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्ह्यातून बरेच लोक, सामाजिक दायित्वातून पुढे आले. यात मराठा सेवा संघ, वर्धा सोशल फोरम, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सेवा निवृत्त अभियंता संघटना, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड आदींचा समावेश आहे. विविध सामाजिक संघटनांच्यावतीने ११ आॅगस्टला स्थानिक आर्वी नाका चौकातून मदत फेरी काढण्यात आली होती. यादरम्यान धान्य, कपडे, औषधी तसेच जीवनोपयोगी साहित्य व रोख स्वरूपात ३७ हजार ९३९ रुपये मदत प्राप्त झाली. तर संभाजी ब्रिगेड कामगार युनियन सेवाग्राम व सेवाग्राम मित्र परिवार यांनी १३ हजार ३०० रुपये रोख, आशिष खंडागळे व संकेत जाचक यांनी १२ हजार ७१० रुपयांची मदत केली. एकूण ६७ हजार ६९९ रुपयांची रोख रक्कम व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था तसेच वर्धा सोशल फोरम यांच्या माध्यमातून तीन लाख रुपये किमतीची औषधी, मराठा सेवा संघ व लोकवर्गणीतून जमा रकमेतून एकूण ६० हजार रुपये किंमतीचे जनावरांसाठीचे औषध, कपडे, दैनंदिन वापराचे साहित्य गोळा झाले होते. ते साहित्य पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात आले आहे. सदर उपक्रमासाठी राजू वानखेडे, सुधीर गिºहे, संजय इंगळे, अॅड. अरुण येवले, अजय मोहोड, सुधीर सगणे, दीपक कदम, विलास कडू, दिनेश काळे, सचिन राऊत, संजय शेळके, सुशांत वानखेडे, पंकज अडेकर, मनोज महाजन, विश्वजीत सेंदुरसे, अजय ठाकरे, विजय कोंबे, गजानन बुरांडे, विवेक बुरघाटे, मंगेश विधळे, सौरभ राऊत, अशोक वेले, निखिल ठाकरे, सौरभ राऊत, मंगेश घुंगरूड, प्रशांत बावणे, कपिल गोडघाटे, नीरज बुटे, अमोल वांदिले, योगिता इंगळे, पूजा जाधव, वंदना गावंडे, संगीता जुमडे आदींनी सहकार्य केले.