सहा महिन्यांपासून महामंडळाचे कर्ज वाटप ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:18 PM2018-06-25T23:18:21+5:302018-06-25T23:18:47+5:30

महात्मा फुले आर्थिक विकास मंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्या जाते परंतु, मागील सहा महिन्यांपासून एकाही बेरोजगाराला कर्ज पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे मागासवर्गीय बेरोजगार संतप्त झाले असून भीम टायगर सेनेच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रश्नावर त्यांनी धडक दिली. व तातडीने कर्ज वाटप करावे अशी मागणी रेटून धरली आहे.

For six months the corporation's debt allocation jumped | सहा महिन्यांपासून महामंडळाचे कर्ज वाटप ठप्प

सहा महिन्यांपासून महामंडळाचे कर्ज वाटप ठप्प

Next
ठळक मुद्देबेरोजगार संतप्त : महात्मा आर्थिक महामंडळाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा फुले आर्थिक विकास मंडळामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी कर्ज दिल्या जाते परंतु, मागील सहा महिन्यांपासून एकाही बेरोजगाराला कर्ज पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे मागासवर्गीय बेरोजगार संतप्त झाले असून भीम टायगर सेनेच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रश्नावर त्यांनी धडक दिली. व तातडीने कर्ज वाटप करावे अशी मागणी रेटून धरली आहे.
लघुउद्योगासाठी प्राप्त झालेले अनेक अर्ज सदर विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी गत सहा महिन्यांपासून निकाली काढलेली नाहीत. त्यामुळे कर्जाची अपेक्षा असलेल्या बेरोजगार तरुणांना सदर कार्यालयाचे उंबरठे झिडवावे लागत आहेत. शिवाय सदर कार्यालयात प्रकरण कुठपर्यंत पोहोचले याची विचारणा करण्यासाठी ये-जा करावी लागत असल्याने आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. शिवाय संबंधितांकडून उडवा-उडवीचे उत्तरे दिली जातात. सदर प्रकरणाची चौकशी करून तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी. तसेच बेरोजगारांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात मागणीवर विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल दिवे, शहर अध्यक्ष विशाल रामटेके, शहर संघटक सुरज बडगे, राजू शेजुरकर, प्रदीप कांबळे, राहुल पिंपळकर, पंकज लभाने यांच्यासह मोठ्या संख्येने बेरोजगार तरुणांची उपस्थिती होती.
तरुणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक होतकरून तरुण शासकीय आणि खासगी कंपन्यांच्या नोकरीकडे पाठ दाखवित स्वयंरोजगाराची कास धरण्याची तयारी दर्शवितात; पण सदर महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी बेरोजगारांना कर्ज वितरण करण्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहेत. चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी आहे.

Web Title: For six months the corporation's debt allocation jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.