जादूटोणा केल्याच्या कारणावरून डोक्यावर दगड टाकल्याच्या प्रकरणात आरोपीस सहा महिन्यांचा तुरुंगवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 07:07 PM2018-04-04T19:07:13+5:302018-04-04T19:07:13+5:30
जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत आरोपीं बेबी शेषराव लोणकर व शेषराव श्रीधर लोणकर या दोघांनाही सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली
हिंगणघाट ( वर्धा ) : जादूटोणा केला असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत आरोपीं बेबी शेषराव लोणकर व शेषराव श्रीधर लोणकर या दोघांनाही सहा महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली . शहरातील माता मंदिर वॉर्ड येथे दिनांक १६ जुलै २०१६ रोजी महिलेस डोक्यावर दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती . या प्रकरणात दोषी बेबी शेषराव लोणकर वय ३५ व शेषराव श्रीधर लोणकर वय ४० यांना हिंगणघाट येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सीमा लाडसे यांनी सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. १४ जुलै २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान माझ्या अंगणात निंबु मिरची का टाकली या विषयावरून जया शरद कारवटकर यांचे सोबत बेबी लोणकर व शेषराव लोणकर यांचा वाद झाला .
वादा दरम्यान बेबी लोणकर ने जयाला पकडून ठेवले तसेच शेषराव लोणकर यांनी आवारातील दगड उचलून जयाच्या डोक्यावर मारला . यात जया गंभीर जखमी झाली . जया कारवटकर च्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसानी गुन्हा नोंदविला व तपास करन प्रकरण न्यायालयात ठेवले . सरकारी अभियोक्ता सचिन गावडे यांनी फिर्यादीसह एकूण सात आरोपी तपासले. या प्रकरणाची पैरवी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गेडाम यांनी केली .