छाननीत सहा नामांकन अपात्र
By admin | Published: September 7, 2016 12:56 AM2016-09-07T00:56:24+5:302016-09-07T00:56:24+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीकरिता दाखल झालेल्या नामांकन अर्जांची मंगळवारी छाणनी झाली.
बाजार समिती निवडणूक : अर्ज परत घेण्याच्या तारखेकडे लक्ष
समुद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीकरिता दाखल झालेल्या नामांकन अर्जांची मंगळवारी छाणनी झाली. यात ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटक गटातून नामांकन दाखल करणाऱ्या सहा जणांचे अर्ज अपात्र ठरले. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर असून यावेळी कोण अर्ज मागे घेतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दीपक बंडुजी धोटे, वसंता मुकाजी मसराम, संजय कमलाकर डेहणे, अमर अरूण झाडे, उल्हास पंढरीनाथ कोटमकर यांनी आर्थिक दुर्बल घटकातून नामनिर्देशन पत्र भरले होते. नियमानुसार २५ हजार रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी या मतदार क्षेत्रात नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे होते; परंतु या सहाही व्यक्तीचे उत्पन्न २५ हजारांच्यावर असल्याने छाणनीत दिसून आल्याने त्यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले. व्यापारी व अडते मतदार संघातून अभयकुमार कस्तुरचंद कोठारी यांनी दोन नामनिर्देशन पत्र भरले होते. त्यांचा एक अर्ज कागदपत्राच्या कमतरतेमुळे अपात्र ठरला तर त्यांचा दुसरा अर्ज कायम राहिल्याने ते थोडक्यात बचावले.(तालुका प्रतिनिधी)