कत्तलीसाठी जाणाऱ्या सहा जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:16 PM2019-03-20T21:16:59+5:302019-03-20T21:18:10+5:30
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी नेणारी सहा जणावरे ताब्यात घेतली. या कारवाईत जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून कत्तलीसाठी नेणारी सहा जणावरे ताब्यात घेतली. या कारवाईत जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी मालवाहू अडवून पाहणी केली असता त्यात जनावरे आढळून आली. वाहनचालकाला आवश्यक कागदपत्राची विचारणा केली असता ते नसल्याने मालवाहू वाहन व वाहनातील तीन गाई, एक कालवड, दोन गोºहे असे एकूण सहा जनावरे पोलिसांनी जप्त केली आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानीश रजा शेख कादर कुरेशी (२४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी जप्त केलेली जनावरे पडेगाव येथील गो-शाळेत ठेवण्यात आली आहेत. ही जनावरे कत्तलीसाठी नेल्या जात होती, असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. सदर कारवाई वर्धा पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात सतीश दुधाने, संदीप चौरे, दिलीप पवार यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.