एकाच रात्री फोडली सहा दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:21 PM2018-12-25T21:21:22+5:302018-12-25T21:21:54+5:30

चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी दोन मेडिकल, गॅस एजन्सीसह अन्य तीन दुकानांचे शटर कापून चोरीचा प्रयत्न केला. यातील तीन दुकानांतून ५५ हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली.

The six shops that were closed in one night | एकाच रात्री फोडली सहा दुकाने

एकाच रात्री फोडली सहा दुकाने

Next
ठळक मुद्देशहर हादरले : तीन दुकानांतून ५५ हजारांची रोख पळविली, पोलिसांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी दोन मेडिकल, गॅस एजन्सीसह अन्य तीन दुकानांचे शटर कापून चोरीचा प्रयत्न केला. यातील तीन दुकानांतून ५५ हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली. चोरीच्या या घटनांमुळे व्यापारी व नागरिक चांगलेच हादरले आहेत. एकाच वेळी सहा दुकानांत चोरीचा प्रयत्न झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
शहरातील बढे चौक परिसरातील तीन दुकानांची कुलपे तोडलेली, तर शटर कापून उघडे केलेले आढळून येताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. याविषयी माहिती मिळताच संबंधित दुकानांचे संचालक आणि पोलिसही घटनास्थळी पोहोचले. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रवीण राजेश धांदे रा. मालगुजारीपुरा यांच्या मालकीच्या शांती मेडिकल फोडून गल्ल्यातील रोख ४ हजार ७०० रुपये लंपास केले. यानंतर विठ्ठल मंदिरालगतच्या श्री साई मेडिकलचे शटर कापून ४७ हजार रुपये लांबविले. हे दुकान विवेक रामदास ढगे, रा. गजानननगरी, नागपूर रोड यांच्या मालकीचे आहे. तसेच बढे चौक येथील जयरमेश खुबचंदानी यांच्या मालकीच्या बाबूजी मोबाईल शॉपीमधून रोख ५ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी विवेक ढगे आणि प्रवीण धांदे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली. घटनास्थळ गाठत पंचनामा केला. श्वानपथक आणि ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मागील काही दिवसांपासून शहरात आणि लगतच्या भागात गस्त बंद असल्याचे सांगण्यात येते. यामुळे भुरट्या चोरीच्या घटना घडत असतानाच सोमवारी रात्री चोरीच्या तब्बल सहा घटना घडल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘ते’ वाहन कैद
चोरीकरिता वापरण्यात आलेले चारचाकी वाहन न्यू इंग्लिश परिसर आणि मालगुजारीपुरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांमध्ये बंद झाले आहे. घटनांतील चोरटे अट्टल असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
चोरट्यांनी नागरी वस्तीनंतर बाजारपेठेकडे वळविला मोर्चा
बाजारपेठेतील या घटनांपूर्वी चोरट्यांनी न्यू इंग्लिश हायस्कूल मार्गालगतच्या दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. परिसरातील बोंबटकर कृषी सेवा केंद्र, विजय उके, रा. मोहिनीनगर यांच्या मालकीच्या बॅटरीच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. मात्र, काहीच हाती न लागल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा बाजारपेठेकडे वळविला. त्यानंतर सावंगी मार्गावरील देवळी नाका येथील न्यू इब्राहिमजी गॅस एजन्सीला लक्ष्य केले. मात्र, येथेही चोरट्यांच्या काहीच हाती लागले नाही.

Web Title: The six shops that were closed in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.