यशोदा नदीतून सहा वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:21 AM2019-01-26T00:21:05+5:302019-01-26T00:21:56+5:30

वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वत्र वाळू चोरी सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय पथकाने देवळी तालुक्यातील दिघी (बोपापूर) व सानेगांव (बाई) या दोन्ही गावातून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रावर धडक दिली.

Six vehicles seized from Yashoda river | यशोदा नदीतून सहा वाहने जप्त

यशोदा नदीतून सहा वाहने जप्त

Next
ठळक मुद्देजिल्हा पथकाची कारवाई : मनमर्जीने वाळूची सुरू होती चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाळू घाटांचा लिलाव झाला नसल्याने सर्वत्र वाळू चोरी सुरु आहे. याची माहिती मिळताच जिल्हास्तरीय पथकाने देवळी तालुक्यातील दिघी (बोपापूर) व सानेगांव (बाई) या दोन्ही गावातून वाहणाऱ्या यशोदा नदीपात्रावर धडक दिली. यावेळी दिघी येथून दोन ट्रॅक्टर तर सोनेगांव येथून चार टिप्परसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी रात्री ९.३० वाजतापासून तर मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चालली.
वाळूघाट बंद असल्याने वर्ध्यातील काही वाळू माफीयांनी देवळी तालुक्यातील यशोदा नदीपात्रात धुडगूस घातला होता. तसेच येथील नाल्यातही मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे लोकमतने खनिकर्म विभागाच्या निदर्शनास आणून दिले. याची माहिती खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांना मिळताच त्यांनी अव्वल कारकुन अनंता राऊत व तलाठी देवेंद्र राऊत यांच्यासह कर्मचाºयांना सोबत घेऊन सुरुवातील दिघी (बोपापूर) येथील नदीपात्राची पाहणी केली. तेथे दोन ट्रॅक्टर आढळून आले असून ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करुन देवळी तहसील कार्यालयात उभे करण्यात आले आहे. हे दोन्ही ट्रॅक्टर देवळीच्या संजय ताडाम यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पथक वायगावकडे निघाले असता वायगाव येथे वाळू घेऊन जाणारा टिप्पर त्यांना आढळून आला. तो टिप्परही जप्त करीत चालकासह वाळू घाटावर धडक दिली. तेव्हा सोनेगांव (बाई) येथील नदीपात्रात तीन टिप्पर आढळून आले. अधिकाºयांचा ताफा बघताच चालकासह मजुरांनी पळ काढला. येथून एम.एच. ३६ एफ १४२९, एम.एच. ४० वाय ३१५१, एमएच जी. ७६६८ व एम.एच ४० एन ६७८० या क्रमांकाचे टिप्पर जप्त करण्यात आले आहे. कारवाईने आता वाळू चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.

वाहनांना मिळत होते बॅकअप
वाळू चोरीचा व्यवसाय सध्या चांगलाच फोफावत असल्याने यासाठी वाळू चोरटे वेगवेगळी शक्कल लढवित आहे. अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना वाळू भरलेल्या ट्रक सुखरुप शहरापर्यंत पोहोचविण्याकरिता मागेपुढे मालक किंवा त्यांच्या व्यक्तीच्या वाहनाचे बॅकअप राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कारवाई दरम्यान दोन कारमधून व्यक्ती या वाहतूकीसाठी गस्त घालत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या वाहनांच्या क्रमांकाची नोंद घेतली आहे. हा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाईल. त्यांच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
- डॉ. इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा.

Web Title: Six vehicles seized from Yashoda river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू