निष्काळजीपणाचे ठरले सहा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:24 AM2018-11-21T00:24:58+5:302018-11-21T00:26:01+5:30
हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागतात. मग कामाचा परिणाम काय होईल, याचा विचारही न करता आगीच्या धगेवर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मंगळवारचा दिवस काळोख बनून आला.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हितभर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागतात. मग कामाचा परिणाम काय होईल, याचा विचारही न करता आगीच्या धगेवर जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात मंगळवारचा दिवस काळोख बनून आला. कंत्राटदाराच्या सांगण्यावरुन अल्प मोबदल्यात काम करणाºया पाच मजुरांसह एका सैनिकाचा मंगळवारी निष्काळजीपणामुळे बळी घेतलाय. तर अकरा मजूर रुग्णालयात स्फोटाचा दाह सहन करीत विव्हळत आहेत.
पुलगाव डेपोतील तसेच इतर ठिकाणाहून आणलेले कालबाह्य बॉम्ब पुलगाव डेपोपासूनच्या काही अंतरावर असलेल्या सोनेगाव (आबाजी) व केळापूर शिवारातील आरक्षित जागेत नष्ट केल्या जाते. हे काम मागील कित्येक वर्षापासून सुरु आहे. आरक्षित जागेत असलेल्या दहा खंदकामध्ये कालबाह्य बॉम्ब निकामी करण्याची जबाबदारी अनधिकृत कंत्राटदाराकडे सोपविल्याने तो कंत्राटदार आपल्या लाभापोटी परिसरातील अकुशल कामगारांचा वापर करतो. येथील मजुरांनाही कमी वेळात जास्त रोजंदारी मिळत असल्याने तेही कंत्राटदाराच्या बोलाविण्यावरुन कामाला निघून जातात. घरच्यांनी नाकारल्यानंतरही काही कामगार व युवक या कामाला पसंती देतात, असे नातेवाईकांनी बोलून दाखविले. विशेषत: हाताला मिळालेले काम आणि त्यातून मिळणाºया पैशातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याचा खटाटोप करणाºया या कामगारांना आजच्या घटनेने चांगलाच हादरा दिला आहे. कामावर गेलेला घरचा व्यक्ती परत येण्याची आस लावून बसलेल्या सोनेगाव (आबाजी) व केळापूरातील पाच परिवारांना त्यांच्या मृतदेहाचेच दर्शन नशिबी आले. तर काहींना रुग्णालयात धाव घ्यावी लागली. यापूर्वीही या परिसरात अशा घटना घडल्या.पण, मंगळवारची ही घटना भयावह असून यापासून तरी परिसरातील मजुरांनी बोध घेण्याची गरज आहे. ही घटना कंत्राटदार व डेपो व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचेच परिणाम असल्याचा आरोप होत आहे.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
बॉम्ब स्फोटानंतर जवळपास बारा जणांना सावंगी रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव (आ.), केळापूर व चिकणी (जामणी) येथील नागरिकांसह जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीअंती राजकुमार भोवते व प्रभाकर वानखेडे यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर चार जण गंभीर जखमी आणि सहा किरकोळ जखमींवर उपचार सुरु करण्यात आले. आपल्या कुटुंबातील सदस्याला रुग्ण खाटेवर पाहून नातेवाईकांनी टाहो फोडला. रुग्णालयात सावंगी पोलसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. रुग्णालय प्रशासनानेही तात्काळ धाव घेऊन जखमींवर उपचार सुरु केले. सहा.पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव व पोलीस उपनिरिक्षक गजानन दराडे यांनी नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
राजकीय नेत्यांसह प्रशासन आले धावून
बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पहाटे घडलेल्या या घटनेची माहिती वाºयासारखी पसरली. सोनेगांव (आ.) शिवारातील संरक्षीत जागेतून जखमींना सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. त्या सर्कलच्या जि.प. सदस्य वैशाली येरावार व जयंत येरावार यांनी सकाळपासूनच रुग्णालयात उपस्थित राहून मदतीसाठी धडपड सुरु केली. सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनीही उपस्थित राहून रुग्णांना तात्काळ सेवा पुरविण्याच्या सूचना दिल्या. तसेच महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे, सेवादलचे अध्यक्ष महेश तेलरांधे, अमित गावंडे यांनी रुग्णांची पाहणी करुन रु ग्णालय प्रशासनाशी व गावकºयांशी संवाद साधला. त्यानंतर देवळीच्या माजी नगराध्यक्षा शोभा रामदास तडस, देवळी न.प.चे उपाध्यक्ष प्रा.नरेंद्र मदनकर यांनीही रुग्णांशी संवाद साधला.
माजी खासदार दत्ता मेघे यांनी रुग्णालय गाठून रुग्णांची पाहणी करुन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने यांनीही रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले.
रुग्णालय प्रशासनाकडून जखमींवर योग्य उपचार -राजीव बोरले
कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करताना सोनेगाव (आबाजी) शिवारात बॉम्ब स्फोट झाला. यातील १२ रुग्णांना सकाळी साडेसात वाजता दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोन रुग्ण उपचारादरम्यान दगावले तर ४ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. तसेच सहा रुग्ण किरकोळ जखमी असून सर्वांवर योग्य ते उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी येथील आरोग्य विभाग सक्षम असल्याची माहिती आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे कुलगुरु डॉ. राजीव बोरले यांनी दिली. रुग्णालयातील जखमींच्या स्थितीबाबत डॉ. बोरले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार तथा रुग्णालयाचे संस्थापक दत्ता मेघे, रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे व मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.महाकाळकर उपस्थित होते.
डॉ. बोरले पुढे म्हणाले की, रुग्णालयात दाखल केलेल्या बारा जणांपैकी राजकुमार भोवते व प्रभाकर वानखेडे यांचा मृत्यू झाला तर प्रवीण श्रीरामे, प्रशांत मुंजेवार, दिलीप निमगडे व मनोज मोरे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आवश्यकतेनुसार त्यांच्या शस्त्रक्रिया केली जाणार आहेत. त्यासाठी रु ग्णालाय प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जात आहे. तीन वर्षापूवीही पुलगावच्या डेपोत मोठा स्फोट झाला होता. त्यात १९ जखमींना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांवर रुग्णालयाच्यावतीने योग्य उपचार करण्यात आले. त्या दरम्यान संरक्षण मंत्र्यांसह सर्वच मोठ्या नेत्यांनी रु ग्णालयाला भेट देऊन सेवेबद्दल समाधान व्यक्त केले होते. आताही सर्व जखमींवर योग्य उपचार सुरु आहेत. त्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर व तज्ज्ञ मंडळी परिश्रम घेत आहे, असे सांगितले.
या घटनेला मिलीटरी प्रशासन व चांडक नावाचा ठेकेदार कारणीभूत आहे. आरक्षित जागेत बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली जात आहे. याआधी एका पत्राद्वारे सरंक्षण मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. अधिकाºयांच्या संगणमताने चांडक ठेकेदार प्रत्येक वेळी दहा लाख रुपये कमवित असल्याने या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई व्हावी.
- रामदास तडस, खासदार, वर्धा.
नेहमीच घडणाºया या घटना दुदैवी ठरल्या आहे. या घटनेतील दोषी अधिकारी व ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करून मृतकांचे कुटुंबियांना ३५ लाखांची मदत द्यावी. तसेच या घटनेची चौकशी करुन दोषींवर योग्य कारवाई करावी.
- चारूलता टोकस,
प्रदेशाध्यक्ष, महिला काँग्रेस कमेटी.
हा प्रकार नित्याचाच झाला आहे. मागील २० ते २५ वर्षांपासून स्फोटकाचा थरार आम्ही अनुभवतो आहे. कालबाह्य झालेले बॉम्ब निकामी करण्याची जबाबदारी ही डेपो प्रशासनाची आहे. परंतु, ती जबाबदारी कंत्राटदारावर सोपविल्याने कंत्राटदार मजूराच्या माध्यमातून हे जोखमीचे काम करीत आहे. यातूनच ही भीषण घटना घडली असून याला कंत्राटदार व डेपो प्रशासनही जबाबदार आहेत. त्यामुळे चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकाराला आळा घालावा जेणे करुन नागरिकांचा बळी जाणार नाही.
- वैशाली जयंत येरावार, सदस्य, जिल्हा परिषद, वर्धा.
पुलगाव येथील अनधिकृत कंत्राटदाराचे डेपो प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत साटेलोटे आहे. त्यामुळे या कामाचा नियमबाह्य कंत्राट अशोक चांडक व शंकर चांडक यांना देण्यात आला आहे. हा कंत्राटदार गावातील मजूर कामावर नेतो. त्यांना अत्पल्प मोबदला देऊन जीवघेणे काम करुन घेतो. कंत्राटदार चांडक व डेपो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली. चांडक यांच्या पुलगाव येथील गोदामात निकामी बॉम्बचे अवशेष साठवून ठेवले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करुन कारवाई करावी.
- निलेश मून, ग्रामस्थ सोनेगांव (आबाजी).
सोनेगाव शिवारात झालेल्या स्फोटात सहा जणांना जीव गमवावा लागला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. पुलगावचे कंत्राटदार शंकर चांडक व अशोक चांडक हे दोघं मिळून मिलिटरीच्या अधिकाºयांसोबत संगनमत करुन स्फोटकाचा गोरखधंदा चालवित आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याने या स्फोटाला चांडक बंधू व मिलिटरीचे अधिकारी जबाबदार आहे. गावातल्या मजुरांना रोजंदारीवर ठेवले जातात आणि त्यांच्या हातून स्फोटकाचे काम करतात. जे काम डेपोच्या अधिकाºयांनी करायला पाहिजे ते काम नियम धाब्यावर बसवून कंत्राटदाराच्या माध्यमातून सुरु आहे. एका बॉम्बपासून जवळपास एक ते सव्वा लाखांचे भंगार जमा होतात. दर आडवड्याला ३० ते ३५