झोपेत माय-लेकाला सर्पदंश

By admin | Published: June 27, 2017 01:13 AM2017-06-27T01:13:46+5:302017-06-27T01:13:46+5:30

घरी खाली झोपून असलेल्या आई व मुलाला मध्यरात्री सर्प दंश झाला. याची माहिती होताच दोघांनाही उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले.

Sleepy snake bite | झोपेत माय-लेकाला सर्पदंश

झोपेत माय-लेकाला सर्पदंश

Next

मुलाचा मृत्यू : आईवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : घरी खाली झोपून असलेल्या आई व मुलाला मध्यरात्री सर्प दंश झाला. याची माहिती होताच दोघांनाही उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात चिमुकल्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर आईवर उपचार सुरू आहे.
मानव गणेश टेकाम (६) वर्षे असे मृतक चिमुकल्याचे तर ज्योती गणेश टेकाम (३०) असे उपचार घेत असलेल्या त्याच्या आईचे नाव आहे. ही घटना धामणगाव (हिंगणी) येथे रविवारी रात्री घडली.
धामणगाव(हिंगणी) येथील ज्योती टेकाम व त्यांचा मुलगा मानव हे दोघे त्यांच्या घरी खाली झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मानव काहीतरी चावल्याने अचानक रडत उठला. मानव रडत उठल्याने त्याच्या आईला जाग आली. यावेळी मानवच्या अंगावर साप असल्याचे निर्दशनास आले. आईने सापाला हाताने फेकण्याचा प्रयत्न केला असता सापाने तिलाही चावा घेतला. यामुळे तिची आरडाओरड सुरू झाली. तेव्हा वडील गणेश टेकाम याने पाहणी केली असता प्रकार उघड झाला. गणेश टेकाम याने मुलाला व पत्नीला घराच्या बाहेर येत शेजाऱ्यांच्या मदतीने सरळ उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालय गाठले. येथे पोहोचताच मानवची तपासणी केली असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर ज्योतीवर उपचार सुरू आहे. मानववर सोमवारी अत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Sleepy snake bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.