पट्ट्यांसाठी झोपडपट्टीधारक धडकले जिल्हाकचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:35 PM2017-09-04T23:35:35+5:302017-09-04T23:35:54+5:30

जिल्ह्यातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतुने तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून गरीब व कष्टकरी जनतेला त्वरित पट्टे देण्याच्या मागणीकरिता....

Slum cluster slips in the district | पट्ट्यांसाठी झोपडपट्टीधारक धडकले जिल्हाकचेरीवर

पट्ट्यांसाठी झोपडपट्टीधारक धडकले जिल्हाकचेरीवर

Next
ठळक मुद्देरिपाइं(आ.)चे निदर्शने : दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील अतिक्रमित झोपडपट्टीवासियांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतुने तसेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून गरीब व कष्टकरी जनतेला त्वरित पट्टे देण्याच्या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ.) च्या नेतृत्त्वात झोपडपट्टी धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी झोपडपट्टी धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले.
गत २० ते २५ वर्षांपासून सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपड्या बांधुन कौटुंबिक उदरनिर्वाह करणाºया नागरिकांना अद्याप कायमस्वरुपी पट्टे मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी या आठही तालुक्यातील अनेक भागात तसेच वर्धा शहरालगत शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडीत राहणाºयांना जागा वन विभागाची असो की, गावठाणाची; पण राहणाºयांना पट्टे देण्याचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील परसोडी, रोहणखेडा, शांतीनगर, बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), पिपरी (मेघे), म्हसाळा, सिद्धार्थनगर, चितोडा, बरबडी, सेवाग्राम, वरुड, आदर्शनगर, गौतमनगर आणि शहरातील अनेक भागातील नागरिकांना जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे मिळालेले नाहीत. यामुळे अशा नागरिकांना पट्टे देण्याची मागणी करीत रिपाइं (आ.)चे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य विजय आगलावे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. निवेदनात अतिक्रमण धारक गरिब कष्टकरी जनतेला लकवरात लवकर पट्टे देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा संघटक महेंद्र मुनेश्वर यांनी दिला. यावेळी प्रकाश पाटील, अजय मेहरा, नरेश ओंकार, सुरेंद्र पुनवटकर, देवानंद तेलतुंबडे, अ‍ॅड. राजेश थुल, विनोद वाघे, वसंत भगत, देविदास भगत, दिलीप सुखदेवे, विजय नगराळे, सतीश इंगळे, धर्मपाल शंभरकर, मोहन वनकर, देवानंद कांबळे, सुभाष कांबळे, गौतम डंभारे, प्रकाश इंगळे, माणिक ताकसांडे, संजय गवई, मुन्ना शेख, संदेश आगलावे, विजय चन्ने, महादेव तागडे, सम्यक ओंकार, राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Web Title: Slum cluster slips in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.