दिव्यांगाना सर्व सुविधांकरिता स्मार्ट कार्ड

By admin | Published: June 30, 2017 01:45 AM2017-06-30T01:45:06+5:302017-06-30T01:45:06+5:30

दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणताही दिव्यांग शासकीय योजनेपासून

Smart card for all the features of Divyangna | दिव्यांगाना सर्व सुविधांकरिता स्मार्ट कार्ड

दिव्यांगाना सर्व सुविधांकरिता स्मार्ट कार्ड

Next

जिल्ह्यात रविवारी पुलगावातून शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोणताही दिव्यांग शासकीय योजनेपासून वंचित राहू नये तसेच एकत्रच सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्या अधिपत्याखाली असलेल्या एलमिको कंपनीच्यावतीने रविवारी तालुकास्तरीय दिव्यांगासाठी शिबिराचे आयोजन केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अपंगत्व बोर्डामार्फत निर्गमित केलेले प्रमाणपत्र व ज्यांचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा जास्त आहे, अशा अपंगाना युडीआयडी क्रमांक देण्यात येणार आहे. दिव्यांगाना प्राप्त होणारे स्मार्ट कार्ड संपूर्ण देशभर एकच ओळखपत्र ग्राह्य राहणार आहे. त्यावरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. मेळाव्यात ज्या दिव्यांगाचे ४० टक्के वर अपंगत्व आहे. अशा दिव्यांगासाठी स्मार्ट कार्ड तयार करण्याची नोंदणी करण्यात येणार आहे.
दिव्यांगानी या मेळाव्यात येताना जिल्हा शल्य चिकित्सकाद्वारे निर्गमित केलेले ४० टक्के वरील प्रमाणपत्र, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, उत्पनाचा दाखला, १ लाख ८० हजारा खालील, मुळपत्र व छायांकित पत्र सोबत आणावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल नारलवार यांनी केले.

Web Title: Smart card for all the features of Divyangna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.