कारमध्ये कोंबून गार्इंची तस्करी
By admin | Published: April 26, 2017 12:29 AM2017-04-26T00:29:29+5:302017-04-26T00:29:29+5:30
आतापर्यंत मोठ्या वाहनात कोंबून गायींची वाहतूक होत असल्याचे समोर आले. अशा वाहनांवर पोलिसांची नजर असते म्हणून की काय,
अल्लीपूर पोलिसांच्या सतर्कतेने तीन गार्इंना जीवदान
वर्धा : आतापर्यंत मोठ्या वाहनात कोंबून गायींची वाहतूक होत असल्याचे समोर आले. अशा वाहनांवर पोलिसांची नजर असते म्हणून की काय, काही व्यापाऱ्यांकडून कारमधून गाईंची तस्करी होत असल्याचा प्रकार अल्लीपूर पोलिसांच्या तपासात उघड झाले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन गायींची मुक्ती करण्यात आली असून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.
पोलीस सुत्रानुसार, अल्लीपूर ठाण्याचे कर्मचारी रात्र गस्तीवर असताना संशावरून एका कारची तपासणी केली. या झडतीत सदर वाहनात तीन गाई कोंबून कत्तलखाण्यात नेत असताना असल्याचे दिसून आले. ही कार्यवाही पोलीस निरीक्षक विजय नाईक, चालक जमादार कंगाले, अभय खोब्रागडे, महेंद्र गायकवाड, संजय वानखेडे, सुशील सायरे यांनी केली. यावेळी अंधाराचा लाभ घेत वाहनातील आरोपींनी पळ काढला. या कारवाईत पोलिसांनी एमएच ३१ डीके ३३०८ क्रमांकाचे वाहन जप्त केले. सदर गायी संगोपनाकरिता वर्धेलगतच्या पडेगाव येथील सर्वोदय गोशाळा चॅरीटेबल ट्रस्ट येथे पाठविण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)