आजपर्यंत भाजपाचा आमदार निवडून न आल्याची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:03 AM2018-04-04T00:03:32+5:302018-04-04T00:03:32+5:30

आजपर्यंत देवळी विधानसभा मतदार संघात भाजपाचा आमदार निवडून येऊ शकला नाही, याची खंत आहे; पण यावेळी भाजपाचा आमदार हेच लक्ष्य राहणार आहे.

 So far, the BJP MLA has not been elected | आजपर्यंत भाजपाचा आमदार निवडून न आल्याची खंत

आजपर्यंत भाजपाचा आमदार निवडून न आल्याची खंत

Next
ठळक मुद्देरामदास तडस : देवळीकरांच्यावतीने नागरी सत्कार व लाडूतुला

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : आजपर्यंत देवळी विधानसभा मतदार संघात भाजपाचा आमदार निवडून येऊ शकला नाही, याची खंत आहे; पण यावेळी भाजपाचा आमदार हेच लक्ष्य राहणार आहे. यासाठी आपसी मतभेद बाजूला सारून भाजपाचे सर्व पदाधिकारी पक्षाच्या उमेदवारासाठी एकजुटीने काम करणार असल्याचा विश्वास आहे, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.
देवळीकरांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. स्थानिक आठवडी बाजार चौकात आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वर्धा विधानसभा मतदार संघाचे आ.डॉ. पंकज भोयर तर अतिथी म्हणून हिंगणघाटचे आ. समीर कुणावार, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गोडे, शंकरराव कापसे, जि.प. सभापती मुकेश भिसे, पं.स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. गटनेत्या शोभा तडस आदी उपस्थित होते. खा. तडस यांची ६५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लाडूतुला करण्यात आली. याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी, शोतोकॉन कराटे असोसिएशन, जि.प., पं.स., न.प. व ग्रा.पं.चे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटना व संस्थांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
खा. तडस पूढे म्हणाले की, देवळी नगर परिषदेने १५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. यामुळे सात दिवसीय खासदार महोत्सवाचे आयोजन करून येथे विविध खेळांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नामवंतांचे आदरातिथ्य केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित करून विकासाला चालना दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित विचार व्यक्त केलेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांनी केले. संचालन सचिन गोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हरिदास ढोक यांनी मानले. कार्यक्रमाला भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष जयंत येरावार, जि.प. सदस्य वैशाली येरावार, मयुरी मसराम, कराटे असोसिएशनचे अनूप कपूर, न.प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, न.प. सदस्य, नंदू वैद्य, संगीता तराळे, संध्या कारोटकर, मिलिंद ठाकरे, मारोती मरघाडे, अ. नईम, दशरथ भुजाडे, अनिल कारोटकर, दीपक फुलकरी यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन रेल्वे गाड्या व थांबा मिळवून देणारा पहिला लोकप्रतिनिधी
वर्धा लोकसंभा मतदार संघाच्या विकासासाठी धडपडणारे विकास पुरूष म्हणून खा. तडस यांची ओळख राहिली आहे. त्यांचे नेतृत्व जोपासणे ही आपणा सर्वांची गरज ठरली आहे, असे मत आ.डॉ. भोयर यांनी व्यक्त केले. तर या जिल्ह्याला नवीन रेल्वे गाड्या व थांबे मिळवून देणारा पहिला लोकप्रतिनिधी म्हणून आ. कुणावार यांनी आपल्या भाषणातून खा. तडस यांचा गौरव केला.
पुरस्कार वितरण व मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या खासदार चषक कराटे चॅम्पियनशिपचे पुरस्कार वितरण खा. रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाय हस्तलिखीत संविधान लिहून लिमका बुकमध्ये स्थान मिळविलेल्या धनंजय नाखले यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

Web Title:  So far, the BJP MLA has not been elected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.