हिंगणघाटात ‘नो व्हेईकल डे’बाबत सामाजिक संघटनांची आज निर्णयार्थ बैठक
By admin | Published: January 21, 2016 02:05 AM2016-01-21T02:05:42+5:302016-01-21T02:05:42+5:30
‘दर गुरुवारी नो व्हेईकल’बाबत लोकमत’ने इनिशिएटिव्हला वर्धा जिल्ह्यातून उंदड प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे. ...
जागर : जिल्ह्याची दर गुरुवारला ‘नो व्हेईकल’कडे वाटचाल
हिंगणघाट : ‘दर गुरुवारी नो व्हेईकल’बाबत लोकमत’ने इनिशिएटिव्हला वर्धा जिल्ह्यातून उंदड प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे. वर्धा, देवळी, पुलगाव, वायगाव(निपानी), आर्वी पाठोपाठ आता हिंगणघाटवासियांनीही आपल्या आरोग्यासह देशाची हानी टाळण्यासाठी हा दिवस पाळावा म्हणून पुढाकार घेतला आहे.
याबाबत विविध सामाजिक संघटनांची स्थानिक तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत गुरुवारी(दि.२१) दुपारी ४ वाजता निर्णयार्थ बैठक बोलाविण्यात आली आहे. या संदर्भात येथील सामाजिक कार्यकर्ता रूपेश लाजुरकर यांनी सर्व सामाजिक संघटनांना उपस्थिती दर्शविण्यासाठी पत्र पाठविले आहे. यामध्ये वर्धा शहर व जिल्ह्यामध्ये ‘दर गुरुवारी नो व्हेईकल डे’ अभियान लोकमतच्या पुढाकारात जिल्हाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांनी समोर येऊन यशस्वीरित्या सुरू केलेले आहे. त्याचप्रमाणे हिंगणघाट शहरातही प्रदूषण कमी करणे आणि आरोग्य सुदृढ राखण्यासाठी ‘नो व्हेईकल डे’चे महत्त्व पटवून देण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत चर्चेअंती योग्य पाऊल उचलण्यात येणार आहे.(तालुका प्रतिनिधी)