मातीपासून श्रीगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:08 AM2019-09-03T00:08:09+5:302019-09-03T00:08:34+5:30
सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित केली होती.
तब्बल २९ विद्यार्थी कार्यशाळेला सर्व सामग्री सहित श्री गणेश साकारायला सज्ज होते. विद्यार्थ्यांनी मूर्ती तयार करण्याचे धडे गिरविले. याप्रसंगी कुबेर फाउंडेशनच्या शैक्षणिक समितीच्या संचालिका मिनल गिरडकर यांनी फाउंडेशनची भूमिका मांडली.
कार्यक्रमाला कार्यक्रमाला वर्ध्यातील कुबेरकर विलास देशमुख, पल्लवी बोदीले, संजय मुळे, सरिता साळवे, सीमा मुळे आदी सातत्याने विद्यार्थ्यांना आवश्यक अशी मदत करीत होते. तेजस भातकुलकर यांच्या कलेतून मुलांनी प्रेरणा घेऊन बिना साच्यातल्या सुंदर मूर्ती तयार केल्या. समारोपीय कार्यक्रमास जयश्री कोटगीरकर उपस्थित होत्या. सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण ही काळाची गरज या संकल्पनेतून दरवर्षी आपणच आपला श्री गणेश साकारावा असे आवाहन कुबेर फाऊंडेशन तर्फे करण्यात आले. या उपक्रमाचे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी कौतुक केले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. या मूर्ती नदी-तलाव आणि विहिरीत विसर्जित केल्याने त्यांचे विघटन होत नसून पाण्याचे नैसर्गिक झरे बंद होतात. त्यावरील रासायनिक रंगांमुळे याशिवाय पाण्यातील जीवजंतूही मृत्युमुखी पडतात, याकडे कुबेर फाउंडेशनने लक्ष वेधत कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मातीच्या मूर्ती खरेदी करण्याचे यावेळी आवाहन केले. सोबतच मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता घरी बादली अथवा टबमध्ये करण्याचाही सल्ला दिला.