शेतकऱ्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:18 PM2019-01-28T22:18:22+5:302019-01-28T22:18:40+5:30
शेतकऱ्यांना तातडीने सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी,यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केले आहे. त्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांना तातडीने सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी,यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेची माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केले आहे. त्यांना तातडीने सौर कृषिपंप जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी दिले.
‘५४१ शेतकऱ्यांनी केली सौर कृषिपंपाची मागणी,पण मिळाली केवळ सात जणांना जोडणी’ या आशयाचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत आमदार डॉ.पंकज भोयर यांनी बोरगाव येथील मुख्य कार्यालयातसौर कृषिपंप योजनेचा आढावा घेतला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पारधी, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष जयंत येरावार, जि.प. सदस्य सरस्वती मडावी, सेलू तालुका भाजप अध्यक्ष अशोक कलोडे, राजू मडावी, उपकार्यकारी अभियंता गावंडे, पडोळे, भुजबळ, मेंढे, करंडे, बाकरे, उज्जेनकर, सेलूचे अभियंता खोडे उपस्थित होते. आ.भोयर यांनी सौर कृषिपंप योजनेची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाºया खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सरकारने सुरू केली. या योजनेंतर्गत १ लक्ष सौर कृषिपंप शासन टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून देणार आहे, असे सांगितले. अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी सौर कृषिपंप योजनेची निविदा काढण्यात आली असल्याची माहिती दिली. लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्ज संकेतस्थळावर भरावा लागणार असल्याने शेतकºयांना अनेक अडचणी यतात. त्यामुळे शाखा व उपविभागीय कार्यालयात महावितरणने आॅनलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था करावी. ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे, त्यांना तातडीने सौरकृषिपंपाची जोडणी देण्यात यावी तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही आमदार भोयर यांनी अधिकाºयांना केल्या.