सेलूत आयपीएल सट्ट्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 11:44 PM2018-05-05T23:44:48+5:302018-05-05T23:44:48+5:30

येथील विकास चौक परिसरातील सचिन खोडे याच्या घरी आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत १ लाख १८ हजार २७० रुपये जप्त करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Soldiers IPL betting racket | सेलूत आयपीएल सट्ट्यावर धाड

सेलूत आयपीएल सट्ट्यावर धाड

Next
ठळक मुद्देनगरसेवकासह केळझरच्या उपसरपंचाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील विकास चौक परिसरातील सचिन खोडे याच्या घरी आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत १ लाख १८ हजार २७० रुपये जप्त करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांत सेलू नगर पंचायतीच्या एका नगरसेवकासह केळझर येथील उपसरपंचाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई शुक्रवार रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
सेलू येथील नगरसेवक सनी खोडे, करण धनुले, बॉबी खोडे याच्यासह केळझर येथील उपसरपंच फारूक शेख अशी अटकेत असलेल्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर हा सट्टा व्यवसाय वर्धा येथील आशू पुरोहीत याचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
शुक्रवारी सुरू असलेल्या मुंबई विरूद्ध पंजाब या क्रिेकेट मॅचवर सेलू येथे मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी माहितीत असलेल्या स्थळी धाड घातली असता तिथे चार जण सट्टा खेळत असल्याचे दिसून आले. या कारवाईत सात मोबाईल, एक एईडी स्क्रिन, एक सेट टॉप बॉक्स, दोन रिमोट, एक पावर बँक, लेटर पॅड, कॅल्क्युलेटर यासह ५ हजार ९४० रुपये रोख असा एकूण १ लाख १८ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत कडू, प्रमोद जांभूळकर, गजानन कठाणे, राकेश आष्टनकर, पंकज टाकोने, गजान गहुकर, प्रदीप वाघ यांनी केली.

Web Title: Soldiers IPL betting racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.