सफाई कामगारांच्या समस्या सोडवा
By admin | Published: May 19, 2017 02:19 AM2017-05-19T02:19:56+5:302017-05-19T02:19:56+5:30
मागील कित्येक वर्षांपासून कामगार दिवस-रात्र आपली कामगिरी बजावत असताना शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे.
आधारची मागणी : ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील कित्येक वर्षांपासून कामगार दिवस-रात्र आपली कामगिरी बजावत असताना शासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे सफाई कामगारांच्या समस्या त्वरित दूर कराव्यात, अशी मागणी आधार संघटनेने केली आहे. याबाबत पिपरी (मेघे) ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे.
सफाई कामगार घाण साफ करीत असताना त्यांची व त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासन स्वीकारत नाही. सफाई कामगारांना कुठलीही सुविधा समिती नाही. हे कामगार सकाळी ६ वाजतापासून काम करीत असतात. त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पिपरी (मेघे) येथील सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश हायजेनिक गोल्ज, मास्क आदी द्यावा. त्यांची व त्यांच्या परिवाराच्या आरोग्याची जबाबदारी ग्रा.पं. ने स्वीकारावी. कारला बायपास येथील हायमास्ट त्वरित सुरू करावेत, दिव्यांग, विकलांगांचा ३ टक्के निधी वाटप करावा, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
१५ दिवसांत समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी विक्की खडसे, सुयोग बिरे, झोटींग, नागोराम मसराम, राकेश देलीकर, नवशाद शहा, किशोर तांदुळकर, गणेश पेंदाम, साई मुंगले, योगेश पवार, डाखोळे, पेंदाम आदी उपस्थित होते.