समाजकल्याण विभागातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:44 PM2018-08-28T23:44:50+5:302018-08-28T23:45:36+5:30

समाज कल्याण विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे गेल्या पाच वर्षापासून क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा.लि. जिल्हा शाखा वर्धा याच्या मार्फत कर्मचारी सामाजिक न्याय भवन व शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था माळी कामासाठी कार्यरत होते.

Solve the questions of contract workers in the Social Welfare Department | समाजकल्याण विभागातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवा

समाजकल्याण विभागातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवा

Next
ठळक मुद्देपंकज भोयर यांना निवेदन : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाज कल्याण विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी हे गेल्या पाच वर्षापासून क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा.लि. जिल्हा शाखा वर्धा याच्या मार्फत कर्मचारी सामाजिक न्याय भवन व शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था माळी कामासाठी कार्यरत होते. सर्व कर्मचाऱ्यांना २४ आॅगस्ट रोजी कामाहून कमी केले अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संलग्न कास्ट्राईब कंत्राटी समाजकल्याण विभागाची कर्मचारी संघटनेने आमदार डॉ. पंकज भोयर यांना दिली. समाज कल्याण विभागातील कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी यांची बैठक आमदार यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी आमदार डॉ. भोयर यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत बैठक लावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच आयुक्त समाज कल्याण, पुणे यांना सुद्धा पत्र पाठवून बैठकीला, मुंबई येथे बोलावण्यात येईल असे सांगितले. बैठकीला महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य सरचिटणीस गजानन थुल, कास्ट्राईब कंत्राटी समाज कल्याण विभागाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आनंद मोगरे, अध्यक्ष रूकेश थूल, सचिव सचिन तिजारे, कार्याध्यक्ष रवींद्र लोहवे, कोषाध्यक्ष ममता बावणे, महिला संघटक कल्पना बिरे, महिला संघटक ज्योती कौरकर, रवींद्र तिजारे, मुख्य संघटक सचिव सुबुद्ध आडे, स्वप्नील तेलंग, जितेंद्र पाटील, शैलेश सोनटक्के, राजेश मेंढुले, दिलीप मसराम, प्रवीण सोनुले, संदेश वागदे, उमेश अवथळे, संजय गुरनुले, अतुल कुबडे, सुवर्णमाला ठाकरे, दुर्गा माकरे, लता नेव्हारे, शामशाद शेख उपस्थित होते.

Web Title: Solve the questions of contract workers in the Social Welfare Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.