आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 06:51 PM2021-10-18T18:51:59+5:302021-10-18T18:54:21+5:30

आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना आंजी-बोरगाव मार्गावर घडली. राजू पंजाब घोगले (५०), रा. बोरगाव (सावळी) असे मृतकाचे नाव आहे.

Son died in accident on mother's death rituals | आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलावर काळाचा घाला

आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलावर काळाचा घाला

Next
ठळक मुद्देआंजी-बोरगाव मार्गावर ट्रॅक्टरने दिली धडक

वर्धा : आईच्या दशक्रियेसाठी आलेल्या मुलाचा अपघातीमृत्यू झाला. ही घटना आंजी-बोरगाव मार्गावर घडली. राजू पंजाब घोगले (५०), रा. बोरगाव (सावळी) असे मृतकाचे नाव आहे.

भरधाव असलेल्या ट्रॅक्टरने ऑटोला धडक दिली. यात राजू घाेगले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नोकरीच्या निमित्ताने राजू यांनी २० वर्षांपूर्वी मूळगाव सोडले. ते गुजरात येथील राजकोट येथे राहत होते.

आईच्या मृत्यूची वार्ता त्यांना कळताच ते दशक्रियेसाठी आपल्या मूळगावी आले. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आंजी येथून बोरगाव (सावळी) येथे ऑटोने जात असताना अज्ञात ट्रॅक्टरने ऑटोला धडक दिली. यात राजू, राजूची पत्नी व ऑटो चालक जखमी झाले. अपघातानंतर तिन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान राजू यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक खुरसुंगे, संतोष कामठी करीत आहेत.

Web Title: Son died in accident on mother's death rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.