उन्ह तापताच पाणवठ्यांवर पाहुण्या पक्ष्यांची गजबज

By admin | Published: February 15, 2017 02:15 AM2017-02-15T02:15:39+5:302017-02-15T02:15:39+5:30

उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील पाणवठ्यांवर पाहुण्या पक्ष्यांची गर्दी वाढते. येथील वर्धा नदीच्या पात्रात असलेल्या पाणवठ्यावर

As soon as they are hot, guests of the birds roam around the water | उन्ह तापताच पाणवठ्यांवर पाहुण्या पक्ष्यांची गजबज

उन्ह तापताच पाणवठ्यांवर पाहुण्या पक्ष्यांची गजबज

Next

वर्धा नदीपात्रात पक्ष्यांची गर्दी : जून महिन्यापर्यंत राहणार मुक्काम; दुर्मिळ पक्षी पाहण्याची संधी
अविनाश वाघ   पोहणा
उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील पाणवठ्यांवर पाहुण्या पक्ष्यांची गर्दी वाढते. येथील वर्धा नदीच्या पात्रात असलेल्या पाणवठ्यावर अशा पक्ष्यांची गर्दी वाढत आहे. पाण्याच्या शोधात विविध प्रजातीच्या दुर्मिळ पक्ष्यांनी मोर्चा वळविला आहे. हे देशी-विदेशी पाहुणे जिल्ह्यातील पक्षीमित्रांना आकर्षित करीत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत या पाहुण्यांचा येथे मुक्काम राहणार असल्याचे काही पक्षी मित्रांनी सांगितले. परिसरातील शिकारी या पक्ष्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असल्याने संबंधित विभागाकडून येथे बंदोबस्त करण्यात येत आहे.
पाण्याच्या शोधात विविध भागातील पक्षी भटकत असतात. यात त्यांना जेथे पाणी मिळेल तेथे ते आपले बस्तान मांडत असतात. डिसेंबर महिन्यापासून देश-विदेशातील बहुतांश प्रजातीचे पक्षी आढळतात. तिबेट, लद्दाख, युरोप, सायबेरिया आदी देशांतून येणाऱ्या जवळपास सर्वच बदकांची नोंद येथे झाली आहे. भारतात दुर्मीळ समजल्या जाणारे प्लवा (स्पॉट बिल्ड डक), रंगीत करकोचा (पेंटेड स्टार्क), उघडचोच करकोचा (ओपन बिल्ड स्टार्क), कांडेसर (व्हाईट नेवु स्टार्क), करवानक (ग्रेट भिक नी), काळा शराटी (ब्लॅक आयनिस), काळ्या डोक्याचा शराटी (ब्लॅक हेडेड आयबिस), मोरबगळा (ग्रेट इग्रेट), तिरंदाज (डार्टर), पाणकावळे (लिटल कारमोनेन्ट), पाणकाडी बगळा (परपल हेरॉन) आदी पक्षी यंदा नदीतील पाणवठ्यात वास्तव्यास असल्याची माहिती पक्षीमित्रांनी दिली.
सदर पक्षी स्थलांतरित असल्याने ते जून अखेरपर्यंत राहणार असून त्यांच्या सवयीप्रमाणे मूळ वास्तव्याच्या ठिकाणी ते स्थलांतर करणार असल्याची माहिती शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथील प्राणीशास्त्र विभागाचे पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव अभ्यासक प्रा.डॉ. गजानन वाघ यांनी ‘लोकमत’ला दिली.
यापैकी काळा शराटी (ब्लॅक आयनिस) या पक्षाने गत पाच वर्षांपासून परिसरात कायमचेच वास्तव्य स्वीकारले होते. त्याने नदीपासून एक किमी अंतरावर असलेल्या बोपापूर गावातील एका चिंचेच्या झाडावर घरटे तयार करून प्रारंभी दोनच पक्षी होते. नंतर त्यांची संख्या सहा झाली; पण शिकाऱ्यांनी शिकारीचा प्रयत्न केल्याने दोन वर्षांपासून या पक्ष्यांनी वास्तव्य सोडले.
दररोज सकाळी ६ ते १० व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सदर पक्षी नदीतील पाणवठ्यात विहार करताना दिसतात. दुपारी मात्र दूरवर निघून जातात. सदर पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी पक्षी अभ्यासक व पक्षीमित्र मात्र पहाटेपासूनच नदीवर पक्षी येण्याची वाट बघताना दिसतात.

Web Title: As soon as they are hot, guests of the birds roam around the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.