बहिणीपाठोपाठ भावानेही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:49 PM2017-08-23T23:49:16+5:302017-08-23T23:49:41+5:30

पेठ अहमदपूर येथील जोहराबी अब्दुल्ला खान (८५) यांचे मंगळवारी रात्री ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

The soul after the sister was left behind | बहिणीपाठोपाठ भावानेही सोडला प्राण

बहिणीपाठोपाठ भावानेही सोडला प्राण

Next
ठळक मुद्देएकाच वेळी अंत्ययात्रा : खान कुटुंबीयांवर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : पेठ अहमदपूर येथील जोहराबी अब्दुल्ला खान (८५) यांचे मंगळवारी रात्री ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते. बहिणीच्या मृत्यूचे वृत्त कळताच त्यांचा भाऊ साहेबखान पीरखान (८०) यांनीही प्राण त्यागला. सोडला. बहीण-भावाचा शेवट एकाच वेळी झाल्याने दोघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे खान कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
अहमद खान हे २५ वर्षांपासून लोकमत समाचार वृत्तपत्राचे पत्रकार आहे. त्यांची आई जोहराबी या त्यांच्याच जवळ राहत होत्या. घरापासूनच काही अंतरावर मामाचे घर आहे. जोहराबी व त्यांचा भाऊ साहेबखान या बहीण-भावाचे एकमेकांवर जीवापाड पे्रम होते. धार्मिक प्रसंग, रक्षाबंधन कार्यक्रमाला सर्व परिवार एकत्र येत होता. जोहराबी आपल्या भावाला दरवर्षी राखी बांधत होत्या. ईदच्या वेळी बहीण-भाऊ सण साजरा करीत होते; पण वय वाढत गेल्याने प्रकृती खालावत होती. यातच मंगळवारी जोहराबी यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच भाऊ साहेबखान पीरखान यांना धक्का बसला. बहिणीवर अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्यांनी जीव सोडला. ही वार्ता गावात पसरताच आष्टी व पेठ अहमदपूर येथील सर्व नातलग, मित्रपरिवार व नागरिक गोळा झाले. बहीण-भावावर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय खान परिवाराने घेतला. यानुसार बुधवारी दुपारी नमाज पठणानंतर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

गावात हळहळ
एकाच गावात राहणाºया बहिणीच्या मृत्यूचा धक्का सहन न करू शकल्याने भावानेही देह त्यागला. दोघांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत होती.

Web Title: The soul after the sister was left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.