हरभऱ्यात ज्वारीची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 09:33 PM2018-12-08T21:33:44+5:302018-12-08T21:34:09+5:30
अस्मानी तथा सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हादरला असला तरी नव नवा प्रयोग करून शेतात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याच्या प्रयत्नात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : अस्मानी तथा सुलतानी संकटाने शेतकरी पुरता हादरला असला तरी नव नवा प्रयोग करून शेतात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याच्या प्रयत्नात आहे.
वर्धा तालुक्यातील पढेगाव येथील प्रगत शेतकरी धनराज साटोणे यांनी आपल्या ओलिताखाली असलेल्या ९ एकर शेतात नवा प्रयोग करीत चना पिकातच ज्वारी पिकाची पेरणी केली. चना व ज्वारी दोन्ही पीक चांगलेच बहरले असल्याचे दिसून येते.
सदर शेतकºयाने २८ आॅक्टोबरला जाकी नावाच्या जातीचा जना व सुवर्णा नावाची ज्वारीची पेरणी केली. ६ तास चना व एक तास ज्वारीचे अशा पद्धतीने ९ एकर शेतात पेरणी केली. यामुळे फवारणी, निंदन, व पिकांची कापणी करणे सोईचे होते, असे शेतकरी धनराज सोटोणे यांनी लोकमतला सांगितले. चनामध्ये ज्वारीची पेरणी केल्यामुळे नैसर्गिकरित्या चना पिकावरील अळीवर नियंत्रण मिळविता येते. चना विकावर क्षाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पक्षी चना पिकांत येत नाही. त्यामुळे घाटेअळी तथा इतर किडी चना पिकाला पोखरून टाकतात व उत्पन्नात घट होते. सदर पिकांत ज्वारीची पेरणी केल्यामुळे पक्षी ज्वारीच्या झाडावर बसून चना पिकांवरील असलेल्या अळींना टिपतात व परत ज्वारीच्या झाडावर पक्षी जाऊन बसतात अळींना पक्ष्यांनी टिपल्यामुळे चना पिकाचे अळीपासून रक्षण होते. तसेच वाळलेल्या ज्वारीचे धांडे, गुरांकरिता चारा म्हणून उपयोगात येते यामुळे गुरांच्या चाºयांचा सुद्धा प्रश्न सुटेल असे साटोणे म्हणाले. उत्पन्नात वाढ होईल हाच उद्देश ठेवून पूर्वी शेतकरी कपाशी पिकांत सुद्धा मोतीतुरा, बाजरी, ज्वारी, आदी पिकांची लागवड करीत असे सदर पिक उंच वाढणारे असल्यामुळे पक्षांना सहज बसता येते व कपाशी, तुर, सोयाबीन, चना पिक कमी उंचीचे असतात. उंच पिकावरून कमी उंचीच्या पिकावरचे किड, अळी पक्षांना टिपण्याकरिता सोयीचे होते. यंदा दुष्काळाच्या सावटात साटोणे यांनी केलेला हा प्रयोग निश्चितच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.