१०.११ टक्के पावसाच्या जोरावर झाली तब्बल १.१० लाख हेक्टरवर पेरणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:07+5:30
एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला असला तरी याच पावसाच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तब्बल १.१० लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. अंकुरलेले पीक जगविण्यासाठी सध्या शेतकरी तारेवरची कसरत करीत असून दमदार पाऊस येईल, अशी आशा करीत जिल्ह्यातील शेतकरी चातकाप्रमाणेच पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
मागील वर्षी २९ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२८.८८ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत जिल्ह्यात केवळ सरासरी ८४.२९ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
एकूणच वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी मोसमी पावसाला सुरुवात झाली, असा अंदाज बांधत जिल्ह्यातील ८० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी १ लाख १० हजार ५६० हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली आहे. एकूणच यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस होण्यापूर्वीच मोठा धाडस करून विविध पिकांची पेरणी केल्याची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे.
१६ जुलैपर्यंत करता येते कपाशी, सोयाबीनची लागवड
- मृग पूर्ण तर निम्मे आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे मोठा धोका पत्कारून सध्या शेतकरीही पेरणीच्या कामांना गती देत आहेत.
- पण १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १०.११ टक्केच पाऊस झाला आहे. असे असले तरी आतापर्यंत जिल्ह्यात १.१० लाख हेक्टर जमिनीवर विविध पिकांची लागवड झाली आहे. शेत शिवारात पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणीची कामे करावे. १६ जुलैपर्यंत सोयाबीन व कपाशीची लागवड करता येते.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.