पेरलेले सोयाबीन रानडुक्करांनी खाल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:27 AM2018-06-21T00:27:45+5:302018-06-21T00:27:54+5:30
शेतात पेरलेले सोयाबीन रात्रीच्या सुमारास रानडुक्करांनी शेतजमीन उकरून खाल्ल्याने पेरलेले बीज अंकुरणापूर्वीच शेतकऱ्याला नुकसानीची झळ सोसावी लागल्याची घटना येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : शेतात पेरलेले सोयाबीन रात्रीच्या सुमारास रानडुक्करांनी शेतजमीन उकरून खाल्ल्याने पेरलेले बीज अंकुरणापूर्वीच शेतकऱ्याला नुकसानीची झळ सोसावी लागल्याची घटना येथे घडली.
येथील फैमिदा बेगम महंमद युसुफ शेख यांची केळझर येथे १.०७ हे आर. शेतजमीन आहे. त्यात गुरुवारी सोयाबीनची पेरणी करण्यात आली. शुक्रवारला सकाळी महंमद युसुफ शेख शेतात गेले असता त्यांना संपूर्ण शेत रानडुक्करांनी उकरून त्यातील पेरलेले सोयाबीन खाल्ल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सेलूच्या वनविभागाला लेखी तक्रार दिली व मोक्का चौकशी करून पंचनामा करण्याची मागणी सेलूचे वनपरिक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक लटपटे यांच्याकडे केली. परंतु त्यांनी सोमवारी पंचनामा करणार असल्याचे सांगितले. रानडुक्करांनी पेरलेले सोयाबीन खाल्ल्यामुळे शेतकरी फैमिदा बेगम यांचे सोळा हजार रूपयाचे नुकसान झाले. शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
जंगलालगतच्या गावातील शेतकरी त्रस्त
कारंजा व सेलू तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. या जंगलातील श्वापद शेतकºयांच्या शेतात येऊन पिकाची नासाडी करतात. त्यामुळे शेतकरी बाराही महिने नुकसानीच्या ओझ्याखाली रहात आहे. शासनाने जंगलग्रस्त भागातील शेतकºयांसाठी विशेष अनुदान द्यावे अशी मागणी आहे.