सोयाबीनवर चक्रीभुंगा तर कपाशीवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:29 PM2017-08-12T22:29:25+5:302017-08-12T22:30:34+5:30

यंदा मान्सून सक्रीय असून पाऊस चांगला येईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता.

Soyabean crisp, and cotton bundlow on cotton | सोयाबीनवर चक्रीभुंगा तर कपाशीवर बोंडअळी

सोयाबीनवर चक्रीभुंगा तर कपाशीवर बोंडअळी

Next
ठळक मुद्देफवारणीचा खर्च वाढला : पावसाच्या दडीमुळे शेतकरी मेटाकुटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा मान्सून सक्रीय असून पाऊस चांगला येईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यानुसार प्रारंभी पाऊस आला; पण सातत्यपूर्ण पावसाची अद्यापही शेतकरी व पिकांना प्रतीक्षा आहे. पावसाच्या दडीमुळे शेतातील कामे उरकली असली तरी सोयाबीन, कपाशीवर विविध अळ्या व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
खरीप हंगामाच्या प्रारंभी उशिरा का होईना बºयापैकी पाऊस झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपत्या घेतल्या. सोयाबीन, कपाशी, तूर पिकांची लागवड जिल्ह्यात करण्यात आली; पण यानंतर पावसाने दडी मारली. यामुळे पिकांवर संक्रांत आली. जिल्ह्यातील काही भागात शेतकºयांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते. काही भागातील पिके जगली असली तरी पावसात सातत्य नसल्याने पिकांची वाढ खुंटली. यानंतर बºयापैकी पाऊस झाल्याने सध्या कपाशी व सोयाबीन ही पिके चांगली होती; पण मागील १५ ते २० दिदवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. प्रारंभी शेतकºयांनी उघाड मिळाल्याने शेतातील डवरणी, निंदण, फवारणीची कामे आटोपती घेतली; पण अद्यापही पावसाचा पत्ता नसल्याने आता पिकांवर विविध रोगांचे आक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी, फुल, पातीवर आलेली कपाशीची झाडे गुलाबी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. शिवाय पानकात्री अळी, चुरडा रोगाचाही प्रादुर्भाव वाढत आहे. पाऊस नसल्याने कपाशीची वाढ खुंटली. सोयाबीन पिकावरही पाने गुंडाळणाºया चक्रभुंगा अळ्यांनी आक्रमण केले आहे.
अळ्यांचे तथा विविध रोगांचे आक्रमण होत असल्याने पिकांची देखभाल करण्यात शेतकºयांना अधिक पैसा खर्च करावा लागत आहे. कीडी नष्ट करण्यासाठी अतिरिक्त फवारण्या कराव्या लागत आहे. यात शेतीचा खर्च वाढत असून पैसा आणायचा कुठून, असा प्रश्न उभा ठाकला आहे. कपाशी, सोयाबीन व तुरीवरही अळ्या, रोगांचे थैमान असल्याने पिके जगविताना कसरत करावी लागत आहे. फवारणीसाठी औषधांसह मजुरांचा खर्च वाढत आहे. कपाशी, सोयाबीन, तुरीवरील अळ्या, रोगांवर कृषी विभागाने उपाययोजना सूचविल्या तरी त्यासाठी लागणारा खर्च कसा भागवावा, हा प्रश्नच आहे. शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे; पण त्या ‘फेल’ पडत आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास पिकांची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाने सुचविल्या उपाययोजना
पं.दे. कृषी विद्यापीठाच्या मते मागील वर्षी उशीरापर्यंत फरदड कापूस घेणे, अळीचा कोष कायम असणे तथा उशिरा पाऊस हे बोंडअळी येण्याचे कारण आहे. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० इसी २ मिली १ लिटर पाणी वा क्विनॉलफॉस २ मिली २ लिटर पाण्यात फवारावे. पक्षी थांबे व सापळे लावावे. सोयाबीनवर चक्रभूंगा कीड आढळल्यास किडीची मादी भुंगा पाणाचा देठ, फांदीवर वा मुख्य खोडावर एकमेकांपासून एक ते दीड सेमी अंतरावर समांतर दोन गोल भाग करून अंडी टाकते. यामुळे चक्रपाताचा वरचा भाग सुकतो. अळी देठ व खोडाच्या आत जाऊन झाड पोखरते. यामुळे संपूर्ण झाड सुकते. यासाठी गरजेनुसार प्रोफेनोफॉस २ मिली लिटर वा ट्रायझोफॉस ४० टक्के १.५ मिली प्रती लिटर फवारणीची शिफारस करण्यात आली आहे.
कपाशीवर फकडी, पांढरी माशी व चुरडा
पवनार - बीटी कपाशीच्या सर्व वाणावर अळ्यांचे आक्रमण झाले आहे. मान्सूनपूर्व लागवड झालेल्या सर्व वाणावर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले असून ही अळी पीक फस्त करीत आहे. वरून न दिसणारी ही अळी बोंडामध्ये शिरून सरकीवर उपजीविका भागविते. यामुळे अळीचा प्रादुर्भाव सुक्ष्म निरीक्षण न केल्यास पाती व बोंड गळाल्यानंतरच लक्षात येतो. शिवाय कपाशीवर फकडी, पांढरी माशी व चुरडा आदी कीडीचेही आक्रमण होत असल्याचे दिसते.
 

Web Title: Soyabean crisp, and cotton bundlow on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.