आॅनलाईन लिलावामध्ये सोयाबीनला २,९११ रुपयांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:14 PM2017-11-28T22:14:42+5:302017-11-28T22:15:33+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन हा शेतमाल विक्रीस आणला असता वर्धा ई-नाम द्वारे आॅनलाईन पद्धतीने लिलाव झाले.

Soybean at the online auction costs Rs 2,911 | आॅनलाईन लिलावामध्ये सोयाबीनला २,९११ रुपयांचा दर

आॅनलाईन लिलावामध्ये सोयाबीनला २,९११ रुपयांचा दर

Next
ठळक मुद्देवर्धा बाजार समितीचे यश : शेतकºयांना मिळाला दिलासा; तरीही व्यापाºयांकडून लूट कायमच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन हा शेतमाल विक्रीस आणला असता वर्धा ई-नाम द्वारे आॅनलाईन पद्धतीने लिलाव झाले. यात सोयाबीनला सर्वाधिक २,९११ रुपयांचा भाव देण्यात आला.
केंद्र शासन अंतर्गत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धामध्ये ई-नाम द्वारे संपूर्ण शेतमालाचा आॅनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बाजार समिती कार्यालयात असलेल्या एल.ए.डी. टीव्ही द्वारे शेतमालाचा लिलाव पाहावयास मिळत आहे. शेतकरी रमेश मेहत्रे रा. सालोड यांचा लॉट क्रमांक ५७ मध्ये व्यापारी दिलीप झाडे यांनी २९११ रुपये या भावामध्ये सोयाबीन खरेदी केली. सदर शेतमालाला हा भाव मिळून शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोयाबीनच्या आयातीवर ३५ टक्के कर लावल्याने होणाºया आयातीवर काही प्रमाणात ब्रेक बसणार आहे. यामुळे देशांतर्गत व्यापाºयांत स्पर्धा वाढण्याचे संकेत आहे. यामुळे येत्या दिवसात सोयाबीनचे दर वाढतील असे संकेत दिसत आहे. यामुळे सोयाबीन ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. तर ज्यांचे सोयाबीन विकल्या गेले त्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पणन मंत्र्यांच्या खासगी सचिवाकडून पाहणी
पणन मंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी वर्धा बाजार समितीला आकस्मिक भेट देत कामकाजाची पाहणी केली. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला. त्यांनी नाफेडद्वारे सुरू असलेल्या खरेदी केंद्राची पाहणी केली व ई-नामद्वारे सुरू असलेल्या शेतमालाच्या लिलावाबाबत शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने आनंद व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा मार्केटींग अधिकारी बिसने, वर्धा बाजार समिती संचालक शरद झोड, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाधव, रोहणकर, शेतकरी, सचिव समीर पेंडके, सचिव माधव बोकाडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Soybean at the online auction costs Rs 2,911

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.