सोयाबीन विक्रीचे आॅनलाईन नोंदणी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:28 PM2017-10-18T23:28:41+5:302017-10-18T23:28:55+5:30
सन २०१७-१८ करीता सोयाबीन या मालाची खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीच्या आत होत असल्यामुळे शासनामार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू ......
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : सन २०१७-१८ करीता सोयाबीन या मालाची खरेदी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीच्या आत होत असल्यामुळे शासनामार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत हिंगणघाट बाजार समितीने जिल्हाधिकारी वर्धा यांचेमार्फत शासनास निवेदनाद्वारे विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे अॅड. सुधीर कोठारी यांनी कळविले आहे.
उपरोक्त बाबी लक्षात घेवून शासनाद्वारे तालुका खेरदी विक्री संस्था यांचे प्रतिनिधीमार्फत त्यांचे कार्यालयात किंवा तालुका हिंगणघाट खरेदी विक्री यांचे प्रतिनिधी मार्फत बाजार समितीचे कार्यालयात शेतकºयांनी चालू खरीप हंगामातील पिकपेरा क्षेत्रानुसार ७/१२ च्या उताºयाची मुळ प्रत, चालू हंगामातील पेरापत्रक, आधारकार्ड, बँक खाते पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक आदी माहिती तालुका खरेदी विक्रीच्या कार्यालयात त्यांचे प्रतिनिधींकडे देवून शेतकºयांनी आधारभूत किंमतीने सोयाबीन विक्री संदर्भाने आॅनलाईन नोंदणी करून घ्यावयाची आहे. संपूर्ण कागदपत्राशिवाय नोंदणी पूर्ण होत नसल्याने वरील सर्व कागदपत्रे शेतकºयांनी नोंदणी करताना सोबत आणणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रतिनिधी मार्फत आधारभूत किंमतीने सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर नोंदणी करणाºया शेतकºयांना माल आणण्याबाबत तालुका खरेदी विक्री मार्फत एसएमएसद्वारे संबंधित शेतकºयांना कळविण्यात येणार आहे. मार्केटींग अधिकारीतर्फे तालुका खरेदी विक्री मर्या. यांचे कार्यालयातील संगणकात व खरेदी विक्री व्यवस्थापक यांचे मोबाईलमध्ये नाफेडद्वारा पुरविण्यात आलेली अॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५ क्विंटलपर्यंत एका शेतकºयाकडून शेतमाल खरेदी केला जाणार आहे.
नाफेडमार्फत हमीदरात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ
वर्धा - कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा मध्ये बाजार समितीच्या यार्डवर बुधवारी नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचा शुभारंभ झाला. यावेळी खा. रामदास तडस यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी शेतकरी शिवशंकर पांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर, संचालक विजय बंडेवार, माणिक सातपुते, जिल्हा मार्केटींग अधिकारी बिसने, सचिव समीर पेंडके आदींची उपस्थिती होती. शासनाने सोयाबीनसाठी आधारभूत किंमत ३,०५० रुपये जाहीर केला आहे. शेतकरी बांधवांनी खरेदी विक्री संघाकडे आपल्या सोयाबीन शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.