देवळीत राबविली विशेष स्वच्छता मोहीम
By admin | Published: January 7, 2017 01:07 AM2017-01-07T01:07:12+5:302017-01-07T01:07:12+5:30
शासनाच्या निर्देशानुसार शहरात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. यात खासदार रामदास तडस
स्वच्छ भारत अभियान : न.प. पदाधिकारी, पोलीस अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग
देवळी : शासनाच्या निर्देशानुसार शहरात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. यात खासदार रामदास तडस यांनी सक्रीय सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला. मागील सप्ताहात न.प. पदाधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच कॉलेजचे प्राध्यापक व एनसीसी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम वेगवेगळ्या वॉर्ड परिसरात राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
शुक्रवारी सकाळी खासदार रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत न.प. ते आठवडी बाजार चौक पर्यंतचा परिसर सर्वांनी हातात झाडू घेवून स्वच्छ केला. परिसरातील कचरा संकलीत करुन विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नगराध्यक्ष सुचिता मडावी, गटनेता शोभा तडस, उपाध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र मदनकर, शिक्षण सभापती कल्पना ढोक, आरोग्य सभापती सुनिता बकाने, महिला व बालकल्याण सभापती सुनिता ताडाम, मुख्याधिकारी विजय देशमुख, प्रशासकीय अधिकारी भास्कर साखरकर आदींचा सहभाग होता. मिरणनाथ महाराज पटांगणात पोलीस विभागाच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या यात्रेमुळे येथे कचरा गोळा झाला होता.
ही मोहिम पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक गजानन दराडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. इंदिरा नगर येथे एसएसएनजे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश उपाध्यक्ष, प्राध्यापक गण, एनसीसी सैनिकांनी सहभाग घेतला. काळा पूल परिसरात न.प. सदस्य गौतम पोपटकर, शाम महाजन, अश्विनी काकडे, राजश्री देशमुख, सुरेश वैद्य यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शहरात राबविण्यात आलेल्या या सर्व मोहिमेत न.प. पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.
विशेष स्वच्छता मोहिमेत न.प. सदस्य नंदू वैद्य, मिलिंद ठाकरे, संध्या कारोटकर, संगीता तराळे, बांधकाम सभापती सारीका लाकडे, मारोतराव मरघाडे, किशोर चिंचपाले, नितीन सायंकार, सुनिल ताकसांडे, महादेव सुरकार, प्रशांत धोबे, आनंद झाडे, राजू भोयर, सुनिल खोंड, धिरज फुलझेले, अशोक झाडे, गजानन खोंड, मंगेश महाजन, उत्तम कामडी, अरविंद खोंडे, शंकर तडस, अंबादास कुडवे व नागरिकांनी सहभाग दिला.(प्रतिनिधी)