गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विशेष जनजागृती मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:43 PM2017-12-29T23:43:39+5:302017-12-29T23:43:50+5:30

नुकतीच कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणाबाब प्रचार व प्रसार करण्यासाठी सेलू तालुका कृषी विभागामार्फत जनजागृतीचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.

Special public awareness campaign to control pink bollwind | गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विशेष जनजागृती मोहीम

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विशेष जनजागृती मोहीम

Next
ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : तज्ज्ञ मंडळी करतील कपाशी उत्पादकांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : नुकतीच कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रणाबाब प्रचार व प्रसार करण्यासाठी सेलू तालुका कृषी विभागामार्फत जनजागृतीचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी तहसीलदार महेंद्र सोनोने, सेलू पं.स.चे गटविकास अधिकारी एस. एम. कोल्हे, कृषी विस्तार अधिकारी एल. एच. सोमणकर, कृषी विस्तार अधिकारी मनोज नागपूरकर, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी प्रचार-प्रसार रथाला हिरवी झेंडी दाखवून पुढील प्रवासाकरिता रवाना केले. हा प्रचार-प्रसार रथ संपूर्ण तालुक्यात पाच दिवस विविध गावात जावून तज्ज्ञ मंडळी कपाशी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करणार आहे. शिवाय प्रत्येक गावात जावून बोंडअळी नियंत्रणाबाबतची माहिती पत्रकेही घराघरात पोहोचविणार आहेत. भविष्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावापासून कसे दूर राहता येईल हे समजावून सांगणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना
कापूस पीक डिसेंबर मध्ये काढून टाकावे व फरदड घेवू नये. कपाशीच्या झाडांमध्ये किडींचे अवशेष राहत असल्याने बांधावर त्याची गंजी करून ठेवू नये. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरण करावी यामुळे किडीची कोष अवस्था नष्ट होते. जिनिंग प्रेसींग तसेच कापूस साठवण केलेल्या जागी प्रकाश सापळे, कामगंध सापळे लावावेत. हंगाम संपल्यानंतर शेतात शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे चरण्यासाठी सोडावीत, आदी उपाय सुचविल्या आहेत.
 

Web Title: Special public awareness campaign to control pink bollwind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.