गिरोलीत आढळले विशेष दगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:28 PM2018-05-03T23:28:03+5:302018-05-03T23:28:03+5:30
देवळी तालुक्यातील गिरोली (इ.) गावात ४०० एकर विस्तीर्ण टेकडी आहे. टेकडीचा भोवती बहार नेचर फाऊंडेशनचे सदस्य दीपक गुढेकर पक्षी निरीक्षण करीत असताना त्यांना मोठ्या दगडावर काही खुणा दिसल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी तालुक्यातील गिरोली (इ.) गावात ४०० एकर विस्तीर्ण टेकडी आहे. टेकडीचा भोवती बहार नेचर फाऊंडेशनचे सदस्य दीपक गुढेकर पक्षी निरीक्षण करीत असताना त्यांना मोठ्या दगडावर काही खुणा दिसल्या. त्यांच्या सोबत असलेले गावातीलच ज्ञानेश्वर पाल यांना त्यांनी विचारले असता हत्ती दगड असल्याचे सांगितले. याची पाहणी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी दीपक गुढेकर यांनी केली आहे.
या गावात सदर मोठ्या दगडाला हत्ती दगड म्हणून ओळखतात. जवळ जाऊन या दगडाला पाहिले असता दगडाला उभ्या रेषेत खाचा मारल्या असल्याचे दिसते. दगडावर २० च्या वर खाचा आहेत; पण तो दगड असा ठेवला आहे की, भुयार रस्ता बंद केलेला असावा. याबाबत पाल यांनी सांगितले की, आणखी असा एक लहान दगड पुर्वेकडे आहे. तो दगड शोधण्यासाठी पाल, प्रशांत बिलुरकर आणि गुढेकर हे सुंदरा करपते यांना सोबत घेऊन निघाले. किमान १ तासानंतर तो दगड सुंदरा यांनी दाखविला. सुंदरा या बकºया चरण्यासाठी या टेकडीवर पूर्वी यायच्या त्यामुळे त्यांना हा दगड येथे असल्याची कल्पना होती. त्या दगडलाही उभ्या रेषेत खाचा मारल्या आहेत; पण त्या अकराच असल्याचे दिसून येते. यावरून एखादी भूयारी मार्ग बंद केला व तो लक्षात राहावा म्हणून असे दगड तर लावले नाही ना असा अंदाज आहे. टेकडीच्या सभोवती मोठाले व मनुष्याला सहज न उचलता येईल असे दगड विखुरले आहेत. जणू किल्ल्याचा पराकोट असावा. काही दगड एकावर एक ठेवलेले आहेत. टेकडीच्या मध्ये कुठेच असे दगड नाही. सपाट टेकडी आहे. मधोमध एक देवीचे जुने मंदिर आहे. ते सुद्धा दगडाचे आहे. गावातील काही युवकानी पडलेल्या मंदिरचे बांधकाम के तेव्हा मोठ तावे सापडले होते, असं सांगतात. त्यामुळे या प्रकरणी पुरातत्त्व विभागाकडून चौकशीची मागणी होत आहे.
टेकडीवरील तलावात ११ महिने असते पाणी
ज्या परिसरात हे विशेष दगड आढळले आहेत त्याच परिसरातील टेकडीवर एक जुना तलाव आहे. त्या तलावात सुमारे किमान दहा महिने पाणी असते. यावरून ती जागा इतिहास कालीन असावी, असा कयास बांधल्या जात आहे. इतकेच नव्हे तर टेकडीवर सदर विशेष दगड आढळून येत नाहीत. त्यामुळे या जागेच्या भूगर्भात किंवा परिसरात काय रहस्य दडले आहे याची शहानिशा पुरातत्व विभागाने पाहणी करून इतिहासाचा काळात लोप पावलेले अवशेष व इतिहासाचा शोध लावावा, अशी मागणी बहारच्यावतीने करण्यात आली आहे.