पांदण रस्त्यांच्या दुरूस्तीला मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:04 PM2017-11-13T23:04:09+5:302017-11-13T23:04:25+5:30

पालकमंत्री पांदण रस्ते दुरूस्ती योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेसाठी तथा जलयुक्त शिवारच्या कामांना गती यावी म्हणून जिल्ह्याला एक पोकलॅण्ड मशीन प्राप्त झाली आहे.

Speed ​​of repair of pontoon roads | पांदण रस्त्यांच्या दुरूस्तीला मिळणार गती

पांदण रस्त्यांच्या दुरूस्तीला मिळणार गती

Next
ठळक मुद्देजलयुक्त शिवारच्या कामांनाही हातभार : वर्धा जिल्ह्याला मिळाली पोकलॅण्ड मशीन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : पालकमंत्री पांदण रस्ते दुरूस्ती योजना जिल्ह्यात राबविली जात आहे. या योजनेसाठी तथा जलयुक्त शिवारच्या कामांना गती यावी म्हणून जिल्ह्याला एक पोकलॅण्ड मशीन प्राप्त झाली आहे. या यंत्रामुळे आता पांदण रस्त्यांच्या दुरूस्ती कामांना वेग येणार आहे.
पोकलॅण्ड मशीनने पांदण रस्ते व जलयुक्त शिवारची कामे होणार आहे. प्रत्यक्ष कामाची सुरूवात तथा मशीनचे लोकार्पण सोमवारी किन्हाळा येथे आ. समीर कुणावार व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विदर्भ इंट्रस्ट्रीज असो.चे उपाध्यक्ष तथा गिमाटेक्सचे संचालक प्रशांत मोहता, सचिव गिरधारी मंत्री, पी.व्ही. टेक्सटाइल जामचे महाव्यवस्थापक भुपेंद्र शहाणे, श्याम अलोणी, किशोर दिघे, सरपंच कांता पाटील, जि.प. सदस्य शुभांगी डेहणे, भाजप तालुकाध्यक्ष संजय डेहणे, असो.चे पदाधिकारी उपस्थित होते.
मशीन प्राप्त व्हावी म्हणून आ. समीर कुणावार यांनी सतत पाठपुरावा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने तथा पालकमंत्री सुधीर मुंनगटीवार यांच्या सहकार्याने विदर्भ इंडस्ट्रीज असो. च्या माध्यमातून पोकलॅण्ड मशीन जिल्ह्याला प्राप्त झाली. ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांचा मुद्दा गंभीर आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित या मुद्यावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन समितीच्या माध्यमातून पांदण रस्त्याकरिता ७५ टक्के शासन व २५ टक्के लोकवर्गणी या तत्वावर पांदण दुरूस्ती योजना आखली. यातून रस्त्यांची निर्मिती होत आहे. संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने पांदण रस्ते दुरूस्त करणारा वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुका पहिला आहे. या मशीनचा दैनंदिन खर्च १० हजार रुपये असून त्यापैकी ७ हजार ५०० रुपये शासन तर उर्वरित खर्च लोकवर्गणीच्या माध्यमातून होणार आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेतकºयांनी योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आ. समीर कुणावार यांनी केले आहे. कार्यक्रमाला विदर्भ इंडस्ट्रीज असो. चे पदाधिकारी, गावातील गणमान्य नागरिक, शाकीर पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
नियोजनातून होणार पांदण रस्त्यांची कामे
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उत्तम प्रशासकीय नियोजनामुळे जिल्ह्यातील संपूर्ण पांदण रस्त्यांची दुरूस्ती होणार असल्याचे मत आ. कुणावार यांनी व्यक्त केले. शेतकºयांनी पांदण रस्त्यांच्या दुरूस्ती तथा अतिक्रमण हटविण्याकरिता २५ टक्के वाटा अदा करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही याप्रसंगी आमदार तथा जिल्हाधिकाºयांनी केले.

Web Title: Speed ​​of repair of pontoon roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.