जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 06:00 AM2020-02-19T06:00:00+5:302020-02-19T06:00:18+5:30
आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आर्थिक वर्ष संपण्यास केवळ ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, ५ हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या ग्रा.पं.ने अद्याप जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च केलेला नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत हा निधी त्वरीत खर्च करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना आ. डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात.
जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या दालनात मंगळवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जि.प.चे उपमुख्य कार्यपालन अधिकारी विपुल जाधव, वर्धा पं.स.चे सभापती महेश आगे, सेलू पं.स.चे सभापती अशोक मुडे, जि.प. सदस्य नुतन राऊत, माजी पं.स. सभापती महानंदा ताकसांडे, नालवाडीच्या सरपंच प्रतिभा माऊस्कर, बोरगावचे सरपंच संतोष सेलूकर, सावंगी येथील सरपंच मिनाक्षी जिंदे, म्हसाळाचे सरपंच संदीप पाटील, साटोडा येथील सरपंच प्रिती शिंदे, हिंगणीच्या सरपंच शुभांगी मुडे, घोराडच्या सरपंच ज्योती घंगारे, केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, विस्तार अधिकारी चौधरी, पं. स. बांधकाम विभागाचे अभियंता संजय उगेमुगे, लिंजाडे, ग्रामविकास अधिकारी सुनील गावंडे, प्रमोद बिडवाईक, आर. एन. तेलरांधे, रंगारी, चव्हाण, जामुनकर, आशिष कुचेवार, आशिष ताकसांडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे यांनी कामांची गुणवत्ता कायम ठेवण्याच्या सूचना संबंधितांना दिल्यात. पारदर्शीपणे कामे झाल्यास त्यावर कुणीच आक्षेप घेणार नाही. तसेच विश्वासर्हता वाढेल. ज्यांची क्षमता असेल अशांनाच कामे देण्यात यावी, असेही ते म्हणाले. कामात हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.