वर्धेत बनावट सॉफ्टवेअर कंपनीचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 11:59 PM2018-03-30T23:59:18+5:302018-03-30T23:59:18+5:30

येथील डॉल्फीन लॉजिक सिस्टिम येथे कार्यरत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीची कोणतीही परवानगी न घेता विकसीत केलेले तंत्रज्ञान दुसऱ्या कंपनीला दिले.

Split software company Wandre | वर्धेत बनावट सॉफ्टवेअर कंपनीचा उलगडा

वर्धेत बनावट सॉफ्टवेअर कंपनीचा उलगडा

Next
ठळक मुद्दे१.८९ लाख रुपयांचे साहित्य जप्त : सुधारीत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

ऑनलाईन लोकमत
वर्धा : येथील डॉल्फीन लॉजिक सिस्टिम येथे कार्यरत असलेल्या माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीची कोणतीही परवानगी न घेता विकसीत केलेले तंत्रज्ञान दुसऱ्या कंपनीला दिले. शिवाय त्या कंपनीच्या माध्यमातून त्यावर कामही केले. हा प्रकार उघड होताच रामनगर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी चौकशीअंती पाच जणांवर कलम ४२०, ३४ सहकलम ४३ बी, डी, एच.आय.जे. ६५.६६ माहिती तंत्रज्ञान कायदा २००, सुधारीत सन २००८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रानुसार, २८ मार्च रोजी डॉल्फीन लॉजीक सिस्टीम्स प्रा.लि. वर्धाचे संचालक कुणाल राजेंद्र राऊत (३६) रा. गोंडप्लॉट यांनी रामनगर ठाण्यात तक्रार दिली. डॉल्फीन लॉजीक सिस्टीम्स प्रा.लि. ही कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार नोंदणीकृत असून २००८ पासून सुरू आहे. सदर कंपनीने नोंदणीकृत कार्यालय गोंड प्लॉट येथे आहे. ही कंपनी मोबाईल अ‍ॅप्स्, वेबसाईट तयार करणे आणि नेटवर्क सोल्युशन इत्यादी मध्ये काम करीत आहेत. याकरिता २०१३-१४ पासून पाच लोकांची नियुक्ती केली आहे. त्यांनी रिंगव्ही नावाचे जीपीएस. ट्रॅकींग अ‍ॅप व असे इतर अनेक अ‍ॅप तयार केले. यापैकी एका कर्मचाऱ्याने आॅक्टोबर २०१७ पासून कार्यालयात येणे बंद केले.
त्यावेळी पासून कंपनीतील एक व्यक्ती व कंपनी सोडून गेलेला व्यक्ती यांनी संगणमत करून डॉल्फीन कंपनीचे मोबाईल अ‍ॅप, सॉफ्टवेअर संबंधाने सोर्सकोडचा वापर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अनधिकृतपणे वापर केला. डॉल्फीन कंपनीतील कर्मचारी विक्की तेलरांधे, निलेश जोगे यांनी सदर कंपनीतून कोणताही अधिकृत राजीनामा न देता कंपनीची फसवणूक करून मडी रोड टेक्नॉलॉजी प्रा.लि. या नोयडा, दिल्ली येथे रजिस्टर असलेल्या बंगलोर बेस कंपनीकरिता वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्याचे काम केले.
विक्की तेलरांधे व निलेश जोगे यांनी डॉल्फीन कंपनीची गोपनीय व मौल्यवान बौद्धिक संपदा दुसºया कंपनीकरिता वापरून कंपनीशी केलेल्या करांराचे उल्लंघन करून कंपनीची फसवणूक केली आहे. तसेच मडी रोड टेक्नॉलॉजीज प्रा.लि. या नोयडा दिल्लीमध्ये असलेल्या कंपनीच्या डायरेक्टर शौर्य शहा आणि चीफ टेक्नीकल आॅफीसर सौरभ मिसाळ यांनी विक्की तेलरांधे व निलेश जोगे यांच्याकडून त्यांची पूर्वीची कंपनी सोडल्याबाबत कोणतेही कागदपत्र न घेता त्यास कंपनीमध्ये काम करण्याची संधी दिली. यावरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकाराची तक्रार येताच वर्धा शहर व सायबर सेल यांनी बापूजीवाडी, रामनगर वर्धा येथील साल्कचे कार्यालयात पंच, टेक्नीशियन व पोलीस स्टाफसह छापा घातला असता तेथे निलेश जोगे, विक्की तेलरांधे, चेतन धांमदे, सुरज पारिसे व शुभांगी बकाने हे काम करीत असताना मिळून आले. त्यांना सदर कंपनीचे अधिकृत व नोंदणीकृत असल्याबाबत कागदपत्र विचारले असता कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही कंपनी अनधिकृतरित्या सुरू असल्याचे दिसून आल्याने लॅपटॉप, संगणक, मोबाईल, डोंगल, डाटा कार्ड, किबोर्ड, माऊस व इतर साहित्य असून एकूण १ लाख ८९ हजार २०० रुपयांचे साहित्य जप्त करून कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने, उपनिरीक्षक एन.यु. खेकाडे, कुलदीप टांकसाळे, जगदीश चव्हाण, निलेश कट्टोजवार, रितेश शर्मा, मंगेश चावरे, अनुप कावळे, दिनेश बोथकर, अभिजीत वाघमारे, संगीता तामगाडगे व शहर पोलिसांनी केली.
कंपनीचे तंत्रज्ञान वापरले अथवा नाही या बाबत तपास सुरू
गुन्ह्यात डॉल्फीन या कंपनीची बौद्धीक संपदा, सॉफ्टवेअर, मोबाईल अ‍ॅपचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. काय याबाबत तपास सुरू आहे. त्यासंबंधाने पुरावा प्राप्त होताच व आरोपी निष्पन्न होताच गुन्ह्यात पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Split software company Wandre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा