श्रीलंकेचे खेळाडू सेवाग्राम आश्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:52 PM2017-10-09T23:52:27+5:302017-10-09T23:52:37+5:30
विविधतेने नटलेल्या आणि पारंपारिक खेळांचा देश म्हणून भारताची ओळख आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : विविधतेने नटलेल्या आणि पारंपारिक खेळांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. या देशातील खेळांचा शास्त्रबद्ध अभ्यास, कौशल्य, तंत्र त्यासोबत खेळातील व्यवस्थापनाचे ज्ञान घेण्यासाठी श्रीलंकेतील ३० खेळाडू व चार अधिकारी अमरावती येथील हनूमान व्यायाम शाळेत प्रशिक्षण घेत आहे. या सर्व प्रशिक्षणार्थिंनी महात्मा गांधी आश्रमला भेट दिली. येथे पाहणी करून त्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला.
आश्रमात प्रवेश केल्यानंतर कार्यकारी अधिकारी भावेश चव्हाण यांनी प्रमुख नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ स्पोर्टस सायन्स कोलंबोचे रजिट्रार समन समरकोन यांचे सूतमाळ घालून स्वागत केले. चव्हाण यांनी आदी निवास, बापू कुटी, दप्तर, आखरी निवास, रसोडा आदिंसह गांधीजींच्या कार्याची माहिती दिली. परिसर, वातावरण आणि प्रार्थना भूमी पाहून सर्वजन अवाक् व भावूक झाल्याचे दिसून आले.
अमरावती येथे १९ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ पर्यंत प्रशिक्षण व अभ्यासक्रम पूर्ण करणार असून व्यायाम शाळेच्या दसरा मेळाव्यात प्रशिक्षणार्थी प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. श्रीलंका सरकारच्या खेळ व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने गतवर्षीपासून या खेळ व अभ्यासक्रमाचे धडे गिरविण्यासाठी आपल्या खेळाडूंना व अधिकाºयांना पाठवित आहे.
सदर मेळाव्याला खेळ व क्रीडा मंत्री दयाश्री जयटोकरा, सचिव डॉ. डी. एम.आर.बी. डिसनाचके, संचालक जी.एल. साजीथ जयलाल उपस्थित होते. या संघासोबत हनुमान व्यायाम शाळेचे प्रा. रवी साहू, एम.बी.ए.चे विद्यार्थी कौशिक टप्पे, अनिकेत रघुवंशी, तसेच उर्मिला साहू, सचिन जोशी इत्यादीचा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी मगन संग्रहालय, बौद्ध स्तुप, गोपुरी, ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. वर्धेतील या ऐतिहासिक वास्तुंचे दर्शन आणि महात्मा गांधी यांचे विचार घेवून वर्धेतुन निरोप घेतला.
भारत-श्रीलंका दोन्ही देश जवळ असून दोन्ही देशाचे संबंध अधिक चांगले आहे. दोन्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे संबंध अधिक चांगले रहावे यासाठी कटीबद्ध आहे. ही भूमी प्रेरणादायी असून याच देशातील भगवान गौतम बुद्ध असल्याने आमची अधिक श्रद्धा आहे. आश्रमात मोकळ्या मैदानावर आणि यात बौद्ध धर्माची प्रार्थना व्हावी हे विशेष. भारत देश आम्हाला जवळच वाटतो क्रीडा मंत्रालयाचा या देशात खेळाडूंना पाठविण्याचा प्रयत्न तो याच हेतूने आहे आम्ही धन्य झालो.
- समन समरकोन, श्रीलंका संघाचे अधिकारी.