तालुकास्तरावर वृद्धाश्रम सुरू करा
By Admin | Published: January 21, 2017 01:04 AM2017-01-21T01:04:01+5:302017-01-21T01:04:01+5:30
सर्वेक्षण अहवालानुसार तीन वृद्धांपैकी एका वृद्धावर अत्याचार होतो, अशी माहिती आहे.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया : मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली मागणी
वर्धा : सर्वेक्षण अहवालानुसार तीन वृद्धांपैकी एका वृद्धावर अत्याचार होतो, अशी माहिती आहे. ही शोकांतिका आहे. मागील शासनाने तर जे काही वृद्धाश्रम हयात होते ते बंद करून टाकले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची चांगलीच परवड होत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या प्रत्येक तालुक्यात वृद्धाश्रम सुरू करावे, अशी मागणी रिपाइंच्यावतीने एका निवेदनातून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व प्रत्येक शहरात आधुनिक पद्धतीचे वृद्धाश्रम सुरू करावे. जेणेकरून रंजत गांजत वृद्ध आहे त्यांना थोडीफार सुखसुविधा प्राप्त होईल. हे मुले असतानाही दैना असलेल्या वृद्धांचे उरलेसुरले जीवन काही प्रमाणात का होईना सुखकर होईल. आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांना हालअपेष्टा सहन करुन जगता येऊ नये, या बाबीचा प्रशासन व शासनाने गंभीर विचार करुन प्रत्येक तालुक्यात व शहरात आधुनिक पद्धतीने शासकीय वृद्धाश्रमाचे त्वरीत नियोजन करावे. यामुळे कर्मचारी वर्गाची भरती होऊन काही प्रमाणात बेकारी हटू शकते नाही. यातून सर्वजन हिताच सर्वजन सुखाय चा एक पवित्र संदेश जनतेमध्ये जाईल. तेव्हा रंजत गांजत असलेल्या वृद्धांना शेवटच्या काळात आधार मिळेल. जे दु:खी आहे. अशा वृद्धांना अनुग्रहीत करावे, अशी मागणीही रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने निवेदनातून करण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)