शासकीय चणा खरेदी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:35 PM2018-05-10T23:35:53+5:302018-05-10T23:35:53+5:30
शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत दि. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग लि. वर्धा यांचे सब एजन्ट म्हणून सिंदी सहकारी शेतकरी विक्री समिती मर्यादित ही संस्था सिंदी रेल्वे येथे चणा खरेदीचे काम करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत दि. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग लि. वर्धा यांचे सब एजन्ट म्हणून सिंदी सहकारी शेतकरी विक्री समिती मर्यादित ही संस्था सिंदी रेल्वे येथे चणा खरेदीचे काम करीत आहे. वखार महामंडळातील गोदामात साठवणुकीसाठी जागा नसल्याने दि. विदर्भा को-आॅपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन लि. वर्धा यांच्या ८ मे २०१८ च्या आदेशान्वये ९ मे २०१८ पासून चणा खरेदी तात्पुरती बंद ठेवण्यात आली. या विरोधात सिंदी रेल्वे येथे आलेले आ. समीर कुणावार व खा. रामदास तडस यांना चणा खरेदी त्वरीत सुरू करण्याबाबतचे व ग्रेडरची वेळ वाढवून देण्याची मागणी निवेदन देऊन शेतकरी संघटनेच्यावतीने माजी जिल्हाध्यक्ष निळकंठ घवघवे यांनी केली आहे.
सिंदी सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादीत या संस्थेकडे ८ मे पर्र्यंत ७०३ शेतकऱ्यांची चणा विक्री करीता आॅनलाईन नोंदणी केली आहे. नाफेडचे ग्रेडर शरद कुंमरे हे आडमुठी धोरण अवलंबित केंद्रावर सकाळी १०.३० ला येतो व ५ वाजता केंद्र बंद बंद करायला लावून परत जात असल्याने ८ मे पर्यंत १० दिवसात केवळ ९८ शेतकºयांचाच चणा खरेदी करण्यात आला. दररोज १५ ते २५ शेतकºयांची नोेंदणी होत आहे. दिवसेंदिवस चणा विक्री करणाºयाची संख्या वाढत आहे; पण ग्रेडरच्या नियमाने फार कमी शेतकºयांचा चणा दिवसाकाठी विक्री करता येत असून चणा खरेदीची अंतिम मुदत २९ मे ही आहे. पुढील महिन्यात शेतकºयांची शेतीची कामे सुरू होत असल्याने कुठलाही चणा उत्पादक शेतकरी चणा विक्री पासून वंचित राहू नये या करिता तात्पुरती बंद करण्यात आलेली चणा खरेदी त्वरीत सुरू करून ग्रेडरला मुक्कामी राहण्याच्या सूचना देण्यात याव्या. चणा खरेदीचे काम रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवावे. कारण चणा विक्री पासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी खा. तडस व आ. कुणावार यांच्याशी झालेल्या चर्चेअंती सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सदर प्रकरणी बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा पणन व्यवस्थापक शाखा वर्धा दि. विदर्भ को. आॅपरेटीव्ह माकेर्टीग फेडरेशनचे देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही.
शेतकरी चणा खरेदीच्या प्रतीक्षेत
नाचणगाव- पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडचे चणा खरेदी केंद्र आहे; पण गोदामाच्या समस्येमुळे येथे अद्याप खरेदी सुरू झाली नाही. यामुळे या केंद्रावर खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
या केंद्रावर खरेदी विक्री संस्था देवळीच्या माध्यमातून नाफेड चणा खरेदी करणार आहे. मात्र, अजूनपर्यंत चणा खरेदी नाफेडकडून सुरू करण्यात आली नाही. आॅनलाईन नोंदणी असल्यानंतर शेतमाल खरेदी प्रक्रिया नाफेड करते. येथे मोजक्याच शेतकऱ्यांची चणा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी झाली. तसेच नोंदणीधारक शेतकऱ्यांचा चणा घेण्यास नाफेड तयार नाही.
या बाबत जिल्हा मार्केटींग अधिकारी व्ही.पी. आपदेव यांच्याशी संपर्क साधला असता गोदामाची व्यवस्था नसल्याने चणा खरेदीत अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरच खरेदी सुरू करण्यात येईल असेही सांगितले.
बाजारपेठ व नाफेडच्या दरात मोठी तफावत असल्याने शेतकरी वर्ग चणा विक्रीसाठी नाफेडच्या खरेदी केंद्रावर चकरा मारत आहेत. शेतमालाला चांगला भाव मिळाल्यावर येणाऱ्या खरीप हंगामात ही रक्कम आपणास वापरावयास मिळेल, अशी शेतकºयांची भावना आहे. नाफेडने लवकरात लवकर चणा खरेदी करावा, अशी मागणी शेतकºयाची आहे.