ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास आरोग्य विभागाची ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:34 PM2017-11-27T22:34:34+5:302017-11-27T22:35:14+5:30

रक्तरंजित क्रांतीच्या शहीदभूमीला राज्य शासनाने मालवण पॅटर्न प्रमाणे ग्रामीण रुग्णालय दिले.

To start the rural hospital, the health department's | ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास आरोग्य विभागाची ना

ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यास आरोग्य विभागाची ना

Next
ठळक मुद्देआश्वासन ठरतेय फोल : रुग्णांना जावे लागते अमरावती अन् नागपूरला

आॅनलाईन लोकमत
आष्टी (शहीद) : रक्तरंजित क्रांतीच्या शहीदभूमीला राज्य शासनाने मालवण पॅटर्न प्रमाणे ग्रामीण रुग्णालय दिले. बांधकाम होऊनही अद्याप वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा भरणा करण्यात आला नाही. परिणामी, रुग्णांना नागपूर व अमरावती येथील रुग्णालयात जावे लागत आहे. दिलेले आश्वासन फोल ठरत असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत त्वरित योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
शासकीय यंत्रणा मनुष्यच चालवितो. तरीसुध्दा त्यांच्या हृदयाला पाझर फुटू नये ही शोकांतीकाच आहे, अशी चर्चा सध्या परिसरात आहे. सुमारे तीन कोटी खर्चुन ग्रामीण रुग्णालय पूर्ण झाले. परंतु, येथे वैद्यकीय, परिचारीका, फर्निचर, तपासणीचे विविध यंत्र अद्यापही आले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कामकाज चालविले जात आहे. त्यामुळे तेथील डॉक्टरांवर सध्या कामाचा अधिकचा बोझा पडत आहे. पण, ते तोंड बंद करूनच बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. हा परिसर जंगलव्याप्त असून दिवसागणिक येथे कुठलीना कुठली अनुचित घटना घडत असते. शिवाय वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी व शेतमजुर जखमी झाल्याचे अनेक उदारहणे आहेत. अशावेळी चांगली आरोग्य सेवा घेण्यासाठी नागरिकांना नागपूर किंवा अमरावती येथील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. गत वर्षी योग्य वेळी चांगली आरोग्य सेवा न मिळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत आष्टी परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी तात्काळ योग्य पाऊल उचलत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची नागरिकांची मागणी आहे.
अनेकांचे लक्ष वेधले; पण कार्यवाही शून्यच
येथे ग्रामीण रुग्णालय नसल्याने नागरिकांना व रुग्णांना अमरावती व नागपूर येथे जावून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे म्हणून काही लोकप्रतिनिधींनी बरेच प्रयत्न केलेत. शिवाय काही सुजान नागरिकांनी नागपूरच्या आरोग्य उपसंचालक, मुंबईच्या आरोग्य संचालक शिवाय आरोग्यमंत्री यांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात येते. इतके होऊनही सुदृढ व निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगणाºयांना अद्याप जाग आली नसल्याची परिसरात ओरड आहे.

Web Title: To start the rural hospital, the health department's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.