जलयुक्त शहर उपक्रमाला सुरुवात
By admin | Published: June 19, 2017 01:10 AM2017-06-19T01:10:19+5:302017-06-19T01:10:19+5:30
पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने जलयुक्त शहर ही संकल्पना साकार करण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे.
खुल्या मैदानात जलसंधारण : पर्यावरणस्नेही संस्था व नागरिकांचे श्रमदान
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने जलयुक्त शहर ही संकल्पना साकार करण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील पाच मोठ्या मैदानामध्ये जलसंधारणाकरिता चर खोदण्यात आले. नागरिकांनी श्रमदान करुन या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
संत तुकडोजी वॉर्डात प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण संवर्धन संस्थेने पुढाकार घेत शहरात ठिकठिकाणी सभा, मार्गदर्शन शिबिर घेऊन नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. श्रमदान करण्याचे आवाहन केले. प्राध्यापक कॉलनीतील दोन मैदान, रिठे कॉलनीतील दोन, सहजीवन सोसायटी येथील एक अशा पाच मैदानांवर दहा बाय दहा आकाराचे चर खोदण्यात आले. नागरिकांच्या सहभागातून राबविलेल्या उपक्रमाला गिरिधर राठी, अशोक चंदनखेडे यांनी सहकार्य केले. प्राध्यापक कॉलनीत प्रा. ज्ञानेश्वर खडसे, रिठे कॉलनीत नितीन सुकळकर, प्रा. कारामोरे, चंदु उताणे, सहजीवन सोसायटीत प्रा. घंगारे, गिरिधर काचोळे यांनी पुढाकार घेत श्रमदानाचे कार्य पार पाडले. आशिष भोयर, प्रदीप गिरडे, अभिजित डाखोरे, रमेश झाडे, हेमंत हिवरकर, छत्रपती भोयर, नितीन शिंगरु, राजेंद्र कोंडावार, ज्ञानेश्वर चौधरी, रामकृष्ण बोडे आदींनी सहकार्य केले.