‘ती’ चुरी उचलण्याच्या कामाला प्रारंभ

By Admin | Published: January 23, 2016 02:18 AM2016-01-23T02:18:24+5:302016-01-23T02:18:24+5:30

वर्धा-वायगाव-हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बारीक चुरी टाकली जात आहे.

The start of the work of picking it 'Chori' | ‘ती’ चुरी उचलण्याच्या कामाला प्रारंभ

‘ती’ चुरी उचलण्याच्या कामाला प्रारंभ

googlenewsNext


वर्धा : वर्धा-वायगाव-हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बारीक चुरी टाकली जात आहे. मात्र ती चुरी रस्त्याच्या कडेला जमा होत असल्याने अपघात वाढले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करताच सदर चुरी उचलून रस्ता स्वच्छ करण्याच्या कामाला सुरुवात झाली.
या मार्गावर मोठ्या कंपन्या, नवोदय विद्यालय व इतरही शाळा महाविद्यालये आहेत. आहे. परिणामी हा मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. त्यामुळे या मार्गाची पुरती दैना झाली होती. त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी वारंवार करण्यात आली. अखेर या रस्त्याचे काम सुरू झाले. नव्याने डांबरीकरण सुरू झाले असताना येथे टाकण्यात येत असलेली चुरी अपघातास कारण ठरत होती. यात एकास जीवही गमवावा लागला. यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच रस्त्याची स्वच्छता सुरू झाली आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The start of the work of picking it 'Chori'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.