पुलगावात आकार घेताहेत गणरायांच्या मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:28 PM2019-08-18T23:28:33+5:302019-08-18T23:29:09+5:30

एकेकाळी प्रसिद्धीस आलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात सध्या काही प्रमाणात उदासीनता असली तरीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे सातत्य अजूनही कायम आहे. शहरामध्ये साधारणत: १५ सार्वजनिक मंडळे असून जवळपास सात हजार घरगुती गणरायाची स्थापना केली जाते.

Statues of republics taking shape in Pulagwa | पुलगावात आकार घेताहेत गणरायांच्या मूर्ती

पुलगावात आकार घेताहेत गणरायांच्या मूर्ती

Next
ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह कायम : शहरात दोन कोटींची होतेय उलाढाल

प्रभाकर शहाकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : एकेकाळी प्रसिद्धीस आलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात सध्या काही प्रमाणात उदासीनता असली तरीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे सातत्य अजूनही कायम आहे. शहरामध्ये साधारणत: १५ सार्वजनिक मंडळे असून जवळपास सात हजार घरगुती गणरायाची स्थापना केली जाते. या उत्सवात शहरामध्ये २ कोटीच्या आसपास उलाढाल होत असल्याने गणरायाच्या आकर्षक मूर्ती साकारण्याच्या कामाला जोर चढला आहे.
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता पंधरवडा शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील १५ मुर्तिकारांकडे गणरायाच्या जवळपास सात हजार लहान-मोठ्या मूर्ती आकार घेत आहे. मुर्तिकरिता लागणारी माती, साहित्य, रंग यामध्ये झालेली भाववाढ व प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तिवरील निर्बंध तसेच मजुरीचे वाढलेले दर या समस्यांचा सामना करीत मुर्तिकार विघ्नहर्त्यांची विविध आकारात, विविध रंगात व मुद्रेत मूर्ती साकारण्यासाठी दिवसरात्र धडपडत आहे. या मातीकला व्यवसायातून शहरातील २०० बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले असून मुर्तिकार वडिलोपार्जीत व्यवसायाचा वारसा जोपासत आहे.
मूर्ती कलेच्या क्षेत्रात वारसा जतन करणारे कुंभारपुऱ्यातील गाते कुटुंबीय, राजू ठाकरे, बबलू राठोड, प्रजापती ठाकूर व इतर मंडळीसुद्धा मूर्ती साकारण्यात व्यस्त आहे. पुलगाव परिसरात शहरी व ग्रामीण भागात जवळपास ६० सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाते.
सात गावात एक गाव एक गणपती बसविला जातो. आता या बाप्पाची तयारी जोरात सुरु झाली असून रस्त्यावरील खड्डे, भारनियमन, नदी पात्राचे प्रदुषण व सुरक्षा व्यवस्था याकरिता पोलीस प्रशासन व नगरपालिका मोठ्या जोमाने कामाला लागली आहे.

इंगळे परिवार जोपासतोय तीन पिढ्यांचा वारसा
शंभर वर्षांची परंपरा असलेला पुलगाव कॉटन मिलचा गणेशोत्सव तीन दशकापूर्वी व्यवस्थापनाच्या उदासीन धोरणामुळे इतिहासजमा झाला. परंतु यानंतरही ५० वर्षांपासून काम करणारी सार्वजनिक मंडळे बाप्पाच्या उत्सवाचे सातत्य राखून आहे. त्याकाळी गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी हरिरामनगरातील नागोराव इंगळे व परिवाराची ओळख होती. यानंतर मारोतराव व सुरेश या दोन मुलांनी हा वारसा पुढे चालू ठेवला तर आता मागील ५ ते ६ वर्षांपासून स्वप्निल व निखिल हे दोघे बंधू इंगळे परिवारातील तिसºया पिढीचा वारसा चालवित आहे. यावर्षी त्यांच्याकडे २५ मोठ्या मूर्तींचे बुकींग असून १२ फुटांची रामदरबार गणेशाची मूर्ती सार्वजनिक गणेश मंडळासाठी सज्ज होत आहे.

आनंद मेळावा घालतो उत्साहात भर
पुलगावच्या बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी बडनेरा, अमरावती, धामणगाव, तळेगाव, नागपूर, वर्धा येथून गणेश मूर्ती विक्रीसाठी येतात. तसेच सजावटीच्या साहित्याचाही मोठा बाजार भरतो. त्यामुळे या उत्सवात २ कोटींची आर्थिक उलाढाल होते. तसेच उत्सावाच्या दहा दिवस शहरात आनंदमेळा लागत असून या मेळ्यातूनही ४ ते ५ कोटीची कमाई केली जात असल्याचे बोलेले जाते.

Web Title: Statues of republics taking shape in Pulagwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.