आंदोलन सुरूच

By admin | Published: May 16, 2017 01:20 AM2017-05-16T01:20:34+5:302017-05-16T01:20:34+5:30

शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.

Stir agitation | आंदोलन सुरूच

आंदोलन सुरूच

Next

कामगारांच्या मागण्यांचा तिढा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. सदर कामगाराला तात्काळ कामावर घेण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी रविवार ७ मे पासून संस्कार अ‍ॅग्रोप्रोसेसमधील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ रोजी कामबंद आंदोलनाच्या आठव्या दिवशीही कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते.
कुठलीही पूर्व सूचना न देता सदर कंपनी प्रशासनाने जवळपास ४० कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप करीत हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. कुठलीही सुचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवार ७ मे पासून प्रहारच्या नेतृत्त्वात कंपनीतील जवळपास ३५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे गजु कुबडे, शहर प्रमुख विकास दांडगे करीत असून आंदोलनात दादा बोरकर, प्रशांत घोडखांदे, नितीन काटकर, उमेश ठाकरे, सुधाकर भोमले, दिवाकर भोभरे, राजु सेलेकर, प्रशांत वेले, ज्योती यादव, वंदना भोयर आदी सहभागी झाले आहे.

भरायला लावला फॉर्म
संस्कार अ‍ॅग्रो प्रोसेसमधील चार कामगारांचे प्रकरण कामगार न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवार १२ मे ला सदर चार कामगार वगळता इतर सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, असे निर्देश कामगार न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने १३ मे ला कामगार कामावर गेले असता कामगारांना एक फार्म भरून देण्यास सांगण्यात आले. परंतु, कंपनी प्रशासनाचा हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाला बगल देणारा असल्याचा आरोप करीत कामगार कामावर रुजू झाले नाही.

शासकीय नियमानुसार आपली कंपनी कामगारांना त्यांच्या कामाचा मोबदला देते. ज्या दिवशीपासून आंदोलन सुरू करण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला मागण्यांचे कुठलेही लेखी निवेदन प्राप्त झाले नाही. सुरूवातीला कामावरून कमी करण्यात आलेल्या चार कामगारांना कामावर घ्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे असे कळले होते;पण आता कामगार न्यायालयानेही त्यावर मार्गदर्शनात्मक निर्देश दिले आहेत. सध्या कामगारांची काय मागणी आहे त्याची आपणाला कल्पना नाही.
- डॉ. कैलास सिंघानिया, संचालक संस्कार अ‍ॅग्रो.पो. वायगाव (नि.)

Web Title: Stir agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.