चोरलेल्या गार्इंची कत्तलखान्यात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:12 AM2018-11-12T00:12:26+5:302018-11-12T00:13:10+5:30

परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

The stolen gaens are slaughtered in slaughter houses | चोरलेल्या गार्इंची कत्तलखान्यात रवानगी

चोरलेल्या गार्इंची कत्तलखान्यात रवानगी

Next
ठळक मुद्देकारवाईची मागणी : शिवसेनेचे पोलीस प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत) : परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायी चोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे गोधन धोक्यात आले आहे. चोरटे चोरलेल्या गाई कत्तलखान्यात पाठवितात. अशी माहिती सतीश टर्के व शिवचरण देवानंद ढाकुलकर यांच्यासह गावकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर शिवसेनेच्यावतीने यासंदर्भात पोलीस प्रशासनाला निवदेनही सादर केले. परंतू चोरटे पोलिसांच्या हाती लागले नसल्याने सतीश टर्के, शिवचरण ढाकुलकर, सिंधू काकडे, रजनीकांत मोरे, हरीभाऊ गावनार, अमोल टिपले यांच्या गायी चोरीला गेल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी याबाबत ठराव घेऊन कारवाईची मागणी केली. तसेच गावकरी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरिक्षकांना निवेदन देत लवकरात लवकर चोरट्यावर तसेच कत्तलखान्यात गायी पाठविण्यावर ताबडतोब कारवाई करावी. अन्यथा गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही निवेदनातून दिला आहे. पोलीस निरिक्षकांना निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख चंदशेखर नेहारे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: The stolen gaens are slaughtered in slaughter houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय