औषधी दुकानावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:36 PM2017-12-16T23:36:55+5:302017-12-16T23:37:08+5:30

समीर मेटांगळे हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. मृतकाच्या समर्थकांनी शनिवारी दुपारी २.४३ वाजताच्या सुमारास आरोपींपैकी एक प्रथमेश व्होरा याच्या वडिलांच्या राधा मेडिकलवर दगडफेक करून काच फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Stonepun at the medicinal store | औषधी दुकानावर दगडफेक

औषधी दुकानावर दगडफेक

Next
ठळक मुद्देसमीर मेटांगळे हत्या प्रकरण : दुचाकीने आले होते सुमारे ५० तरुण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समीर मेटांगळे हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. मृतकाच्या समर्थकांनी शनिवारी दुपारी २.४३ वाजताच्या सुमारास आरोपींपैकी एक प्रथमेश व्होरा याच्या वडिलांच्या राधा मेडिकलवर दगडफेक करून काच फोडल्या. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दगडफेक करणारे सुमारे ५० तरुण दुचाकीने आले होते. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विभव गुप्ताला शनिवारी रामनगर पोलिसांनी अटक केली.
इंस्टाग्रामवर ‘आजची मुले आम्हाला शिकवतील काय’ असा मजकूर समीरच्या मारेकºयांपैकी काही तरुणांनी टाकला. तो कुणाला उद्देशून टाकला, याची विचारणा करण्यासाठी एकेकाळी चांगले मित्र असलेले आठ तरुण म्हाडा कॉलनी चौकात एकत्र आले. पैकी पाच जण समीर सोबत तर विभव गुप्तासह दोघे तेथे हजर होते. प्रारंभी शाब्दीक चकमक झाली. वाद विकोपाला जात हाणामारी झाली. यावेळी विभवने जवळील चाकू समीरला भोकसून त्याची हत्या केली. इतर तिघांनाही जखमी केले. यावेळी विभव जवळील चाकू हातातून पडला नाही वा तो कुणी हिसकावला नाही; पण घटनेत तो देखील जखमी झाला असून सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारी समीरवर अंत्यसंस्कार होताच दुपारी २.४३ च्या सुमारास समीरच्या समर्थकांनी थेट आरोपी असलेल्या व्होराच्या राधा मेडिकलवर दगडफेक केली. या घटनेत कुणी जखमी झाले नसले तरी मनोज व्होरा यांचे नुकसान झाले.
ग्राहक दडले दुकानांत
दुचाकीवर ५० तरुणांनी दुकानावर दगड फेकण्यास सुरूवात केली. यावेळी दुचाकीने आलेले काही तरुण अनियंत्रित होऊन रस्त्यावर पडले; पण त्यांनी स्वत:ला सावरत पुन्हा हातातील दगड मेडिकलच्या दिशेने भिरकावले. यावेळी दुकानातील ग्राहक दुकानातच मिळेल त्या ठिकाणी दडून बसले होते. हल्लेखोर गेल्यानंतर सुमारे १५ ग्राहक सुखरूप दुकानाबाहेर पडले व त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
तक्रार देणे टाळले
राधा मेडिकलवरील दगडफेकीत मनोज व्होरा यांचे नुकसान झाले. घटनेची वार्ता पसरताच बघ्यांची गर्दी झाली होती. या प्रकरणी व्होरा यांनी तक्रार देण्यास मात्र नकार दिल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात दहशत होती.
रात्री उशीरा दोघांना सोडले
प्राथमिक चौकशीसाठी शुक्रवारी दुपारी एका अल्पवयीनासह प्रथमेश व्होराला रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर रात्री ११ वाजता त्यांना मुक्त केले. दोघेही समीरला मारहाण करताना आरोपीसोबत होते, हे विशेष! शनिवारी रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, योगेश गाढवे, रंजीत काकडे, ओमप्रकाश टेकाम, सागर चांगोले, मितेश पाटील यांनी विभवला अटक केली.
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
इंगोले चौकातील मनोज व्होरा यांच्या राधा मेडिकलवर तरुणांनी दगडफेक केली. हे नेमके कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे.
राजकीय दबावाचा वापर
आरोपी विभव गुप्ता सोबत प्रथमेश व एक अल्पवयीन मुलगा मारहाण करताना हजर होते. यानंतर तिघेही दुचाकीने पळाले. प्रथमेशच्या वडिलांचे औषधी दुकान असून डॉक्टरांशी संबंध आहे. याचा वापर ते मुलाला वाचविण्यासाठी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. काही राजकीय पुढारीही हस्तक्षेप करीत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Stonepun at the medicinal store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.