पुरवठा विभागातील मनमर्जीला बे्रक लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:21+5:30

ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. इतकेच नव्हे तर काही जण शिधा पत्रिकेत असलेल्या चुकांची दुरूस्ती तसेच आरसी क्रमांक टाकून घेण्यासाठी येतात. परंतु, तहसील कार्यालयातील या विभागात सध्या मनमर्जी पद्धतीने कामे केली जात आहेत. तर आरसी नोंदविण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत.

Stop the Arbitrary supply section | पुरवठा विभागातील मनमर्जीला बे्रक लावा

पुरवठा विभागातील मनमर्जीला बे्रक लावा

Next

युवा परिवर्तन की आवाजचे तहसीलदारांना साकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तालुक्यातील गावा गावातून नागरिक नवीन शिधा पत्रिका बनवून घेण्यासाठी तसेच जुन्या शिधा पत्रिकेत दुरूस्ती करण्यासाठी तहसील कार्यालयात येतात. परंतु, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सध्या मनमर्जी कामे केली जात आहे. त्यामुळे गरजु आणि गरिबांना नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर मनमर्जी कामाला बे्रक लावण्यात यावा, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाजच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे.
ज्या गरीब आणि गरजुंकडे शिधा पत्रिका आहे त्यांना शासनाच्यावतीने अल्प दरात धान्य दिले जाते. इतकेच नव्हे तर विविध शासकीय कामादरम्यान शिधा पत्रिकेचा वापर होत असल्याने नवीन शिधा पत्रिका तयार करून घेण्यासाठी अनेकजण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात येतात. इतकेच नव्हे तर काही जण शिधा पत्रिकेत असलेल्या चुकांची दुरूस्ती तसेच आरसी क्रमांक टाकून घेण्यासाठी येतात. परंतु, तहसील कार्यालयातील या विभागात सध्या मनमर्जी पद्धतीने कामे केली जात आहेत. तर आरसी नोंदविण्याच्या नावाखाली ५० ते १०० रुपये नागरिकांकडून घेतले जात आहेत.
विशेष म्हणजे सदर पैसे स्विकारल्यावर कुठलीही पावती नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे सुरू असलेल्या या मनमर्जी कारभारावर प्रश्न निर्माण होत आहेत. शिवाय तेथे येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या प्रकरणी तातडीने कार्यवाही करीत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. निवेदन देताना युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, आशीष मेश्राम, अ‍ॅड. अरुण येवले, गौरव वानखेडे, सोनु दाते, प्रितेश इंगळे, अमित शेंदरे, दिनेश देवतळे, अनुप तांमगाडगे, अमित भोसरले, बबलू राऊत, रोहीत कडू, अविनाश सोमनवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Stop the Arbitrary supply section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.