बसपाची निदर्शने व रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:37 PM2018-08-11T23:37:10+5:302018-08-11T23:37:39+5:30
दिल्ली येथील काही संघटनानी संविधानाची प्रत जाळून त्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बसपाच्यावतीने स्टेशन चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना त्वरीत अटक करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : दिल्ली येथील काही संघटनानी संविधानाची प्रत जाळून त्याचा अपमान केल्याच्या निषेधार्थ बसपाच्यावतीने स्टेशन चौकात शनिवारी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संविधान जाळणाऱ्यांना त्वरीत अटक करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. केंद्रातील भाजपा शासनाच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलन करणाºया जवळपास ३३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.
यावेळी बसपाचे नेते राजेश लोहकरे, सोनू मेंढे, विनोद बोरकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील बसपा कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकात संविधान की सन्मान मे बी.एस.सी. मैदान मे च्या घोषणा देत जवळपास २० मिनिटे चक्का जाम केल्यामुळे स्टेशन चौकाकडे येणाºया मार्गावर वाहनाची रांग लागली होती.
पोलिस निरीक्षक मुरलीधर बुराडे, उपनिरीक्षक सैयद फरहान यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून प्रतिबंधक कायद्यान्वये ३३ कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले व विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत सुरू केली. हिंगणघाट येथे पोलिस निरीक्षकांना निवेदन देताना अॅड. आर.डी.कांबळे, निलेश चनकापूरे, मयूर सुखदेवे, स्वप्नील नगराळे, श्रीधर गेडाम, प्रशांत जगताप, चक्षुपाल सिंपी, श्रीकृष्ण वावरे, शरद फुसाटे, रतन वडे, चंदन जांभुळकर, अनिल मून, रसपाल शेंदरे, मनीष कांबळे, रवी रंगारी आदी उपस्थित होते