पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:23 PM2018-06-04T23:23:44+5:302018-06-04T23:23:57+5:30

Stop farmers' farm for crop loans | पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट थांबवा

पीक कर्जाकरिता शेतकऱ्यांची फरफट थांबवा

Next
ठळक मुद्देआमदारांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी अद्याप बहुतांश शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. तसेच कर्जमाफी योजनेतील अडचणीही कायम आहेत. अशा अवस्थेत बँक व्यवस्थापकांकडून शेतकºयांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन पीक कर्जाकरिता होणारी फरफट थांबवावी, अशा सूचना वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर यांनी प्रशासनाला सोमवारी दिल्या.
जिल्हाकचेरीत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत आ.डॉ. भोयर यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, नगर रचनाकार सुनील देशमुख, अग्रणी बँक व्यवस्थापक वामन कोहाड, सहायक उपनिबंधक जयंत तलमले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी व उपअभियंता मंत्री यांची उपस्थिती होती.
यावेळी शेतकरी नेते प्रशांत इंगळे तिगावकर, जयंत कावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे, अशोक कलोडे, नगर पालिका बांधकाम सभापती नौशाद शेख, माजी बांधकाम सभापती निलेश किटे यांनी विविध समस्या मांडल्या.
सेलू तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे शेतकरी संतप्त झाला असल्याने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. तेव्हाच जिल्हाधिकारी नवाल यांनी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक कोहाड यांना कारवाईच्या सूचना केल्या. तसेच सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांवप्रमाणे नियमात राहून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आवश्यकता असल्याचेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. या बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही समस्यांचा पाढा वाचला.
कंत्राटदाराला दिला तीन दिवसांचा अतिरिक्त वेळ
शहरातील दादाजी धुनिवाले चौक ते धंतोली चौकापर्यंतच्या सिमेंटीकरण व रूंदीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्याचा विचार करता ३० मे पर्यंत रस्त्याचे व नालीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदारांनी बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या वेळात काम पूर्ण झाले नाही तर कंत्राटदारावर रोजचा एक लाखांचा दंड ठोठावा, असेही सांगितले होते. कालावधी निघून गेला; पण काम पूर्णत्वास गेले नसल्याने दंड आकारण्याच्या सूचना या बैठकीत केल्या असता बांधकाम विभागाकडून तीन दिवसांचा अतिरिक्त कालावधी मागण्यात आला, त्यामुळे जिल्हाधिकारी नवाल यांनीच तीन दिवसात काम पूर्ण करा अन्यथा कंत्राटदारावर दंड आकार अशा सूचना केल्या.
पांदण रस्त्याकरिता शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद
शेतकऱ्यांच्यापांदण रस्त्याची मोठी अडचण होत असल्याने अतिक्रमण मुक्त पांदण रस्ते ही योजना आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आली आहे. याकरिता शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत २०० किलो मीटर पर्यंतचे पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहे. मागणीनुसार मशीन कमी पडत असल्याने अजूनही १२० अर्ज प्रलंबित असल्याचे यावेळी आमदारांना सांगण्यात आले आहे.

Web Title: Stop farmers' farm for crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.