जाम चौरस्ता येथील अवैध दारूविक्री केंद्रे बंद करा

By admin | Published: June 11, 2017 12:53 AM2017-06-11T00:53:32+5:302017-06-11T00:53:32+5:30

जाम चौरस्ता येथे अवैध दारूविक्री केंद्रे आहेत. ही अवैध दारूविक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.

Stop the illegal liquor shops at Jam Chaurasta | जाम चौरस्ता येथील अवैध दारूविक्री केंद्रे बंद करा

जाम चौरस्ता येथील अवैध दारूविक्री केंद्रे बंद करा

Next

नागरिकांची मागणी : ठाणेदार, तहसीलदार व अधीक्षकांनाही निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : जाम चौरस्ता येथे अवैध दारूविक्री केंद्रे आहेत. ही अवैध दारूविक्री त्वरित बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबबात पोलीस अधीक्षक, ठाणेदार प्रवीण मुंडे यांना निवेदन सादर केले. निवेदनाच्या प्रती आ. समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्यात.
जाम येथे महामार्गालगत एका व्यक्तीने वार्ड क्रमांक तीनमध्ये दारूचे खुले दुकानच सुरू केले आहे. मागील अनेक दिवसांपासून हा दारूविक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. जाम गाव औद्योगिक वसाहत आहे. नागरिक या खुल्या दारूविक्रीमुळे त्रस्त आहेत. नागरिकांनी विक्रेत्याला समजावित दारूविक्री बंद करण्यास सांगितले असता तो नागरिकांना धमकावत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. परिसरात दारूमुळे अपघातांत वाढ झाली आहे. येथील दारूविक्री बंद करून गाव दारूमुक्त करावे, अशी मागणी निवेदनातून नागरिकांनी केली आहे. निवेदनावर जामचे उपसरपंच सचिन गावंडे, प्रमोद चौखे, संदीप भोयर, महादेव बैलमारे, अमोल जागडेकर, चांगदेव राऊत, अजय खेडेकर, विजय अवघडे, गोविंदा सराते, गजू खेडेकर, सोनबा जीवनकर, प्रकाश येलगुडे, लक्ष्मण लोणारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Web Title: Stop the illegal liquor shops at Jam Chaurasta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.