पांढºया सोन्याची थट्टा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:30 PM2017-11-06T23:30:03+5:302017-11-06T23:30:21+5:30

पडलेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दरावरून पांढºया सोन्याची हेळसांड नेहमीचीच झाली आहे.

Stop the muzzle of white gold | पांढºया सोन्याची थट्टा थांबवा

पांढºया सोन्याची थट्टा थांबवा

Next
ठळक मुद्देकापूस उत्पादक शेतकरी संघ : जिल्हाधिकाºयांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पडलेल्या दरामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. दरावरून पांढºया सोन्याची हेळसांड नेहमीचीच झाली आहे. यंदाही ती कायमच आहे. यामुळे कापसाला प्रती क्विंटल ५ हजार २०० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकरी संघाने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांना सोमवारी निवेदनही देण्यात आले आहे.
विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी वर्धा एक आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी हे मुख्य पीक म्हणून घेत आहेत; पण काही वर्षांपासून कापसाच्या दराबाबत शासन उदासिन असल्याचे दिसून आले आहे. सरकार कच्च्या तेलामध्ये भरमसाठ नफा कमवित असताना पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहे. त्यातच परिवहन महामंडळ दिवाळी हंगामात एसटीची भाडेवाड करून नफा कमवित आहे. याच पद्धतीचा अवलंब करीत कापसाचा भाव का वाढविला जात नाही, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे. कापसाची खरेदी यावर्षी ५ हजार २०० क्विंटल दराने करावीच, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीवर २० नोव्हेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास २१ नाव्हेंबरनंतर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आपल्या कुटुंबीयांसह रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना मिलिंद हिवलेकर, धनंजय थूल, गुलाब कंगाले, प्रभाकर खंडाळे, राजू तेलरांधे, सदानंद बढे, नारायण चचाणे, श्यामराव वाढवे, पुंडलिक सोनटक्के, भगवान डोंगरे, दादाराव नखाते, बबन वरटकर, निलेश लोणकर, सुरेश ठाकरे, सुरेश तेलरांधे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करा
सेलू तालुक्यातील केळझर परिसरातील कृषीपंपाला महावितरणच्यावतीने विद्युत पुरवठा केला जातो; पण सध्या भारनियमनाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगली श्वापदे असून ज्यावेळी विद्युत पुरवठा सुरू असतो, त्यावेळी पिकांना पाणी देणे धोक्याचे ठरत आहे. यामुळे भारनियमनाचे जुनेच वेळापत्रक कायम ठेवावे. या भागातील कृषीपंपांना विद्युत पुरवठा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

Web Title: Stop the muzzle of white gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.